सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
 जिल्हा

लायन आणि लिओ क्लब द्रोणागिरी यांच्या विद्यमाने जनकल्याण सेवाश्रम पनवेल येथे कार्यक्रमाचे आयोजन.

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी)    03-12-2024 14:02:14

उरण : लायन क्लब ऑफ द्रोणागिरी व लिओ क्लब ऑफ द्रोणागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने  जनकल्याण सेवाश्रम पलस्पे पनवेल येथे अनाथ मुले  व वृध्द लोकांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.त्या कार्यक्रम मध्ये गायन , नृत्य, नाटक , व मुलांसाठी खेळ ठेवण्यात आले होते. सर्व कलाकारांनी आपली कला खूप छान प्रकारे सादरीकरण केले.सर्वांनी खूप मोठ्या प्रमाणात एन्जॉय केले . व तेथील वृध्द लोकांनी लायन व लिओ मेंबर्स ना शुभेच्छा व आशिर्वाद दिले. लायन क्लब ऑफ द्रोणागिरी तसेच लिओ क्लब ऑफ द्रोणगिरी गेले ३ वर्ष उरण  मध्ये  सातत्याने समाजकार्य करत आहे. लायन क्लबचा इतिहास तुम्ही बघितला असाल तर इंटरनॅशनल पातळी वर त्यांचं खूप मोठ नाव आहे.

लायन मेम्बर्स् च्या  मदतीने  वेगवेगळे ॲक्टिव्हिटी दिवसेन दिवस होत असतात. एज्युकेशन, अन्नदान, मेडिकल कँप, सिडबॉल ,  झाडे लावणे, बीच क्लीन करणे, कॉलेज साठी सेमिनार अशा विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटी होतच असतात. समाजासाठी एक हातभार लावण्यासाठी क्लब मधील सर्व मुले आज सातत्याने काम करत आहेत.आणि पुढे ही गोर गरिबांसाठी लोकांसाठी काम करत राहतील असा हा क्लब नेहमी सर्वांसाठी मदत करत राहील.

असे मनोगत विविध मान्यवरांनी व्यक्त केले.कार्यक्रमास उपस्थित डिस्ट्रिक्ट गवर्नर लायन एन.आर परमेश्वरन,लायन आश्वीनी सावंत , लिओ क्लब ऑफ द्रोणगिरी अध्यक्ष लिओ लायन ॲड. चेतन भोईर, उपाध्यक्ष लिओ सेजल ब्राह्मणे, सेक्रेटरी लिओ विनीत कासकर, खजिनदार लिओ आरती सुरवसे, लिओ श्रीश म्हात्रे ,आदिती पाटील ,लिओ युवराज चव्हाण, लिओ सिद्धी साळुंके, लिओ दर्शन ठाकूर, लिओ रजत ठाकूर , लिओ पूजा बंडगर ,लिओ सलोनी सरवणकर, खजिनदार लायन ॲड. दिपाली गुरव ,नम्रता पूनकर, ॲड. प्रणाली चिकने व आश्रमातील लहान मुले व वृध्द लोक  उपस्थित होते.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती