सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
 जिल्हा

जासई ग्रामपंचायतची ग्रामसभा संपन्न

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी)    03-12-2024 15:17:49

उरण : उरण तालुक्यातील जासई ग्रामपंचायतीची ग्रामसभा  सरपंच संतोष रामचंद्र घरत यांच्या अक्ष्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर ग्रामसभेमध्ये बहूसंख्य मतदार बंधू भगिंनी उपस्थित होत्या. ग्रामसभेमध्ये सर्व विषयांवर धोरणात्मक निर्णय घेवून विशेषता १५ वा वित्ता आयोग GPDP आराखडा २०२५/२०२६ शासन मार्गदर्शक सुचनेनुसार प्रारूप आराखडा तयार करणे, स्वच्छ भारत अभियाण ग्रामिण, माझी वसुंधरा ०.५, मागासवर्गीयांच्या उन्नती बाबतचे विषय, व इतर विषयांवर नियोजनात्मक निर्णय घेण्यात आला.

तसेच ग्राम पंचायत हद्दीतील विधवा, निराधार, गरीब गरजू महिलांना ग्राम पंचायतीच्या फंडातून रक्कम रुपये ५०००/- अर्थिक मदतीचा लाभ हि योजना अटी शर्तींना अधीन राहून मंजूर करण्यात आली. स्वच्छ भारत अभियाण कचरा संकलन कामी सर्व उपस्थित महिलांना ग्राम पंचायती मार्फत डजबीन वाटप करण्यात आले. ग्राम सभेचे कामकाज सुरू करण्यापूर्वी सभागृहात भारताचे संविधान उद्देशिका शपथ घेण्यात आली. सदर सभेला  सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत अधिकारी व सर्व सदस्य, जेष्ठ नागरीक व बहूसंख्येने महिला उपस्थित होत्या.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती