मुंबई : येत्या 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा होणार आहे. ज्या दिवशी चैत्यभूमी येथे अनेक लोक येत असतात. आणि या लोकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात काम केले जाते. त्यामुळे महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुट्टी त्यांनी जाहीर केलेली आहे.
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमीवर जो कार्यक्रम होणार आहे, त्या ठिकाणी नक्की कोणत्या सोयी सुविधा केल्या जाणार आहेत. याचा संपूर्ण आढावा घेतलेला आहे. दरवर्षी चैत्यभूमीवर मोठ्या उत्साहाने महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “दरवर्षी बाबासाहेबांना अभिवादन देण्यासाठी अनेक लोक येत असतात. आणि दरवर्षी ही संख्या वाढतच आहे. त्यामुळे त्यांना भोजन, स्वच्छता, वैद्यकीय सुविधा वाहतूक सुरक्षा आणि इतर सुविधांचा देखील पुरवठा झालाच पाहिजे यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावयाला पाहिजे.”
त्याचप्रमाणे यावर्षी हेलिकॉप्टरद्वारे पुष्पदृष्टी होणार आहे. आणि परिसराची स्वच्छता देखील राखण्यात येणार आहे. याबद्दलच्या सूचना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकावर मदत कक्ष उभारण्याचे देखील सांगितलेले आहे. याबद्दल बोलताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “दरवर्षी चांगल्या सुविधांचा पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जातो. यावर्षी देखील यामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही. याची काळजी घेतली जाईल. त्यामुळे महापरिनिर्वाण दिनासाठी सगळ्यांनी तयारीला लागा. आणि चांगल्या दर्जाच्या सुविधांचा पुरवठा या ठिकाणी करा.”