सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
 राज्य

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल गोळीबारात थोडक्यात बचावले:सुवर्ण मंदिराच्या गेटवर सेवा करत होते, आरोपीला अटक

डिजिटल पुणे    04-12-2024 13:01:48

अमृतसर : श्री अकाल तख्त साहिबने माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांना सोमवारी धार्मिक शिक्षा दिली. त्यानुसार सुखबीर सिंग सुवर्ण मंदिरात भांडी घासणार, लंगर घरात सेवा करणार आणि श्री दरबार साहिबच्या गेट बाहेर चौकीदारी करणार आहेत. हे शिक्षेचे पालन 17 जणांना करण्यात आले आहे. दरम्यान, आज सकाळी सुखबीर सिंग बादल यांच्यावर काही जणांनी गोळीबार केला. मात्र, ते थोडक्यात बचावले आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर बुधवारी सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार करण्यात आला. मात्र, ते थोडक्यात बचावले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आरोपीला पकडले. त्याच्याकडून एक पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सुखबीर बादल यांना सुरक्षित केले आहे.

गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे नाव नारायण सिंह चौडा असे असून तो गुरुदासपूर येथील डेराबाबा नानकचा रहिवासी आहे. तो दल खालसाचा सदस्य आहे. अकाल तख्त येथे शिक्षा भोगण्यासाठी बादल सकाळीच पोहोचले होते. ते क्लॉक टॉवरच्या बाहेर एक भाला धरून बसले होते. त्यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

2 डिसेंबर रोजी, राम रहीम प्रकरणातील 5 सिंग साहिबांची श्री अकाल तख्त साहिब येथे बैठक झाली, ज्यामध्ये त्यांना आणि इतर मंत्रिमंडळ सदस्यांना शिरोमणी अकाली दल सरकारच्या काळात धार्मिक गैरवर्तनाच्या आरोपाखाली शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणात, 30 ऑगस्ट 2024 रोजी सुखबीर सिंग बादल यांना श्री अकाल तख्तने 'तनखैय्या' (धार्मिक गैरवर्तनासाठी दोषी) घोषित केले होते.

हल्लेखोर हातात पिस्तुल घेऊन आला आणि त्याने सुखबीर सिंग यांना लक्ष्य करत गोळीबार करण्यास सुरुवात केली. मात्र, तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी तातडीनं हल्लेखोराचा हात धरला आणि एक गोळी हवेत फायर झाली. जमावाने हल्लेखोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. या प्रकरणाची आता चौकशी करण्यात येत आहे. हल्लेखोराने आपलं नाव नारायण सिंह चौरा असल्याचं सांगितलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी 'बब्बर खालसा' संघटनेशी संबंधित असून तो पाकिस्तानातही जाऊन आलेला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर नारायण सिंह चौरा हा 'बब्बर खालसा इंटरनॅशनल' या संघटनेचा (BKI) दहशतवादी आहे. नारायण चौरा 1984 मध्ये पाकिस्तानात गेला होता आणि दहशतवादाच्या सुरुवातीच्या काळात पंजाबमध्ये शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांची तस्करी करण्यात त्याचा हात होता. पाकिस्तानमध्ये राहून त्यांने गोरिल्ला युद्धनिती आणि देशद्रोहाशी संबंधीत एक पुस्तकही लिहिलं आहे. 'बुडैल जेलब्रेक' प्रकरणातीलही तो आरोपी आहे. नारायण याने यापूर्वी काही प्रकरणांमध्ये पंजाबमधील तुरुंगात शिक्षाही भोगली आहे. 

पंजाबमधील शिरोमणी अकाली दलाच्या सरकारनं २००७ ते २०१७ या काळात केलेल्या चुकांसाठी बादल आणि इतर नेत्यांना 'तन्खा' (धार्मिक शिक्षा) सुनावताना अकाल तख्तमधील शीख धर्मगुरूंनी सोमवारी ज्येष्ठ अकाली नेत्याला सेवादार म्हणून काम करण्याचे आणि सुवर्ण मंदिरात भांडी धुण्याचे आणि शूज स्वच्छ करण्याचे निर्देश दिले होते. ही शिक्षा भोगण्यासाठी बादल व त्यांचे सहकारी सध्या सुवर्ण मंदिरात गेले आहेत.

एका हातात भाला घेऊन निळ्या रंगाच्या सेवादार गणवेशात असलेले बादल मंगळवारी आपल्या व्हीलचेअरवर सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर शिक्षा भोगत होते. त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.अकाली नेते सुखदेवसिंग ढिंडसा यांनाही वयोमानामुळं व्हीलचेअरवर बसवण्यात आलं होतं, तर पंजाबचे माजी मंत्री बिक्रमसिंग मजीठिया आणि दलजीतसिंग चीमा यांनी भांडी धुतली.बादल आणि ढिंडसा यांच्या गळ्यात छोटे छोटे फलक लावण्यात आले होते. त्यात त्यांनी केलेल्या गैरकृत्यांची कबुली देण्यात आली होती. दोन्ही नेत्यांनी एक तास सेवादार म्हणून काम पाहिलं.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती