सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 राज्य

महाराष्ट्राच्या करीना थापा आणि केया हटकर ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने सन्मानित

डिजिटल पुणे    27-12-2024 12:45:33

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या दोन धाडसी आणि प्रेरणादायी मुलींच्या शौर्य आणि प्रतिभेचा सन्मान राष्ट्रीय स्तरावर करण्यात आला. अमरावतीच्या करीना थापाला शौर्यासाठी तर मुंबईच्या केया हटकरला तिच्या साहित्य व सामाजिक कार्यासाठी ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवी, राज्यमंत्री श्रीमती सावित्री ठाकूर व महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे सचिव अनिल मलिक उपस्थित होते.

या पुरस्काराचे स्वरूप पदक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे असून, यंदा 14 राज्यांमधील10 मुली व 7 मुले असे एकूण 17 मुलांना गौरविण्यात आले. यामध्ये शौर्य, विज्ञान-तंत्रज्ञान, कला-संस्कृती, समाजसेवा, क्रीडा आणि पर्यावरण यांसारख्या विविध क्षेत्रांतील असामान्य कामगिरी करणाऱ्या मुला-मुलींचा समावेश आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती