नवी दिल्ली : शिखांचे दहावे गुरु, गुरु गोबिंदसिंग यांचे सुपुत्र बाबा जोरावरसिंह आणि बाबा फतेहसिंह यांच्या अतुलनीय शौर्याला समर्पित ‘वीर बाल दिवस’ निमित्त या शौर्य सुपुत्रांना राजधानीत अभिवादन करण्यात आले.
कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात श्रीमती नीवा जैन, निवासी आयुक्त (अ.का.) यांनी बाबा जोरावरसिंह आणि बाबा फतेहसिंह यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र परिचय केंद्रात “वीर बाल दिवस” निमित्त बाबा जोरावरसिंह आणि बाबा फतेहसिंह यांच्या शौर्याला अभिवादन
वीर बाल दिवस निमित्त बाबा जोरावरसिंह आणि बाबा फतेहसिंह यांच्या अतुलनीय शौर्याला महाराष्ट्र परिचय केंद्रात अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर अरोरा यांनी बाबा जोरावरसिंह आणि बाबा फतेहसिंह यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित कर्मचाऱ्यांनीही वीर बालकांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून त्यांच्या त्याग व शौर्य यांचे स्मरण केले.