सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 राज्य

स्वातंत्र्यापूर्वी जन्मलेले शेवटचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग अनंतात विलीन; शासकीय इतमामात

डिजिटल पुणे    28-12-2024 17:16:19

नवी दिल्ली - माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर संपूर्ण सैन्यदलाच्या इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यासाठी गृहमंत्रालयाकडून संरक्षण मंत्रालयाला विनंती करण्यात आली होती. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची अंतिमयात्रा आज सकाळी 9:30 वाजता एआयसीसी मुख्यालयापासून स्मशानभूमीपर्यंत काढण्यात आली.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे पार्थिव दिल्लीतील निगम बोध घाटावर नेण्यात आले.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी निगम बोध घाटावर नेण्यात येत आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे अंतिमयात्रेत सहभागी झाले आहेत.माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अखेरच्या प्रवासाला काँग्रेस मुख्यालयातून सुरुवात झाली आहे. त्यांच्या पार्थिवावर निगमबोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी काँग्रेसच्या मुख्यालयात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरची श्रद्धांजली वाहिली.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल अमेरिकेचे (मावळते) राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी शोक व्यक्त केला. व्हाईट हाऊसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'कठीण काळात, पंतप्रधान सिंग यांनी आपले जीवन समर्पित केले होते. त्यासाठी आम्ही पुन्हा वचनबद्ध आहोत. जिल आणि मी त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि भारतातील सर्व लोकांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो".

काँग्रेसच्या मागणीनंतर केंद्र सरकारनं मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी जागा देण्याची तयारी दर्शविली आहे.माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी सरकार जागा देणार आहे. याबाबतची माहिती त्यांचे कुटुंबीय आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना कळवण्यात आल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयाकडून शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलं. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मल्लिकार्जून खर्गे आणि मनमोहन सिंग यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. स्मारकासाठी जागा देण्यात येणार असल्याचं अमित शाह यांनी सांगितलं. जागा देण्याकरिताट्रस्टची स्थापना करावी लागेल, असे गृह मंत्रालयानं म्हटले आहे.

मनमोहन सिंग यांच्या प्रयत्नांमुळे अर्थव्यवस्थेत प्रगती: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनावर भाजपा नेत्या प्रनीत कौर यांनी दु:ख व्यक्त केले. त्यांनी पंजाबमधील पटियाला बोलताना म्हटले, " माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानं संपूर्ण जगात दु:ख व्यक्त केले जात आहे. त्यांनी देशासाठी केलेल्या प्रयत्नामुळे अर्थव्यवस्थेची प्रगती झाली. दोनवेळा पंतप्रधान झाल्यावर त्यांनी सक्षमपणे सरकार चालवले. त्यांनी सर्व पक्षांना एकत्र ठेवले. त्यांच्या पत्नी आणि मुलींना माझ्या मनापासून संवेदना आहेत. त्यांच्यासारखी व्यक्ती आता आपल्यात नाही. हे खूप दुःखदायक आहे.

देशाच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92 व्या वर्षी गुरुवारी रात्री निधन झाले. 2004 ते 2014 या काळात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारमध्ये दोन वेळा पंतप्रधान राहिलेले सिंग यांची प्रकृती गेल्या काही महिन्यांपासून बिघडली होती. त्यांच्या पश्चात पत्नी गुरचरण सिंग आणि तीन मुली असा परिवार आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती