पुणे: महिलांविरोधात घडणारे गुन्हे रोखण्यासाठी अनेक कठोर पावलं उचलण्यात आली आहेत. कठोर कायदे बनवण्यात आले आहेत. मात्र, तरीही घडणाऱ्या गुन्ह्यांच प्रमाण कमी झालेलं नाही. पुण्याच्या राजगुरुनगर भागात दोन अल्पवयीन मुलींसोबत घडलेल्या घटनेमुळे आधीच नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. बीअर बारमध्ये काम करणाऱ्या 54 वर्षीय आरोपीने त्याच्या घराबाहेर खेळणाऱ्या दोन मुलींची अत्याचार केले, नंतर त्यांची निर्घृण हत्या केली. आरोपीला कठोरात कठोर शासन व्हावं, यासाठी संतप्त नागरिकांना आंदोलन कराव लागलं होतं.ही घटना ताजी असताना पुण्यात एका महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
माझ्या अंगात देव येतो असे सांगत महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ३६ वर्षीय महिलेनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी तक्रारदार यांच्या घरी आला होता. त्याने माझ्या अंगात देव येतो यासह वेगवेगळ्या बतावणीकरून महिलेवर प्रभाव पाडला.
नंतर वेगवेगळ्या निमित्ताने घरी येऊन या महिलेचा विश्वास संपादन केला. नंतर वारंवार घरी येऊन तो मुक्कामी राहू लागला. योवळी महिला दोनही मुलांसोबत एकटीच असताना आरोपी तिच्या बेडरूमध्ये गेला. त्याने चाकुचा धाक दाखवून त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केला, असे पोलिसांनी सांगितले आहे. पुढील तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत.