उरण : बेलपाडा गावचे सुपुत्र, जेएनपीए कंपनीचे कर्मचारी , कामगार नेते मधुकरशेठ नामदेवशेठ पाटील हे जेएनपीए कंपनीतून ३६ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले. त्या निमित्ताने त्यांचा सेवापुर्ती सन्मान सोहळा व त्या प्रित्यर्थ मधुकरशेठ नामदेवशेठ पाटील यांनी स्व खर्चाने बांधलेला बेलपाडा जनसंपर्क कार्यालयाच्या प्रवेशदाराचे उदघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तसेच जेएनपीए मल्टीपर्पज हॉल टाऊनशिप येथे मधुकरशेठ पाटील यांचा सेवापुर्ती सन्मान सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रम प्रसंगी पनवेल महानगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, माजी आमदार बाळाराम पाटील, शेकापचे युवा नेते प्रितम म्हात्रे यांनी मधुकरशेठ यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जेएनपीए मल्टीपर्पज हॉल येथे झालेल्या सेवापुर्ती सन्मान सोहळा प्रसंगी पोर्ट अँड डाक महासंघाचे राष्ट्रीय महासचिव सुरेश पाटील, राष्ट्रीय कोषाध्यक्ष सुधीर घरत, केंद्रीय प्रभारी चंद्रकांत अण्णा धुमाळ, जेएनपीए विश्वस्त रवी पाटील, कामगार नेते रवि घरत, माजी प्राचार्य अरुण घाग, संघटक डी पी सोनावणे, उरण पंचायत समितीचे माजी सभापती नरेश घरत, रयत सेवक संघांचे नुरा शेख, जासई ग्रामपंचायतचे सरपंच संतोष घरत आदी मान्यवर उपस्थित होते.सेवापुर्ती सन्मान सोहळ्या निमित्त विविध जिल्ह्यातून आलेल्या मित्र मंडळींनी, कामगार वर्गांनी, मान्यवरांनी मधुकरशेठ पाटील यांना अंगावर शाल घालून पुष्पगुच्छ देऊन, भेट वस्तू देऊन सत्कार केला.
मधुकरशेठ पाटील यांचे सुपत्र विवेक पाटील व पाटील कुटुंबियांचा यावेळी सत्कार करण्यात आला.सुरेश पाटील, सुधीर घरत, रवि पाटील, रवि घरत,अरुण घाग,नुरा शेख आदी मान्यवरांनी मधुकरशेठ यांच्या कार्याचे गौरव करत त्यांनी केलेल्या सुरवातीपासून ते आजपर्यंत संघर्षमय जीवनाचा प्रवास सर्वांना सांगितला. आपापली मते व्यक्त करून त्यांनी पुढील वाटचालीसाठी मधुकरशेठ यांना शुभेच्छा दिल्या.प्रेमळ, हसतमुख, मनमिळावू, सर्वांना सोबत घेउन चालणारे व्यक्तिमत्व असल्याने विविध कामगार संघटना, संस्था, विविध सामाजिक संस्थेचे, संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते. मोठया उत्साहात, आनंदात मधुकरशेठ पाटील यांचा सेवापुर्ती सन्मान सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रसिद्ध निवेदक नितेश पंडित यांनी केले. स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.