सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 जिल्हा

वाल्मीक कराडच्या जीवाला धोका; न्यायालयाकडे केली मोठी मागणी

डिजिटल पुणे    03-01-2025 15:39:03

बीड : सध्या राज्यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे आक्रोशाचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मीक कराड हा कोठडीत शिक्षा भोगत आहे. परंतु वाल्मीक कराडला कोठडीत अनेक चांगल्या सुविधा पुरवल्या जात असल्याचा गंभीर आरोप विरोधांकडून केला जात आहे. अशातच, कराडने आपल्याला गंभीर असल्याचे सांगत मदतनीसची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मीक कराडने सांगितले आहे की आपल्याला स्लिप एपनिया नावाचा आजार आहे. त्यामुळे ऑटो सीपॅप नावाची मशीन विशिष्ट दाबाने वापरण्याचा सल्ला डॉक्टरांकडून त्याला देण्यात आला आहे. म्हणूनच ही मशीन चालवण्यासाठी आपल्याला कोठडीमध्ये 24 तास मदतनीस देण्यात यावी, अशी मागणी वाल्मिक कराडने केली आहे. याबाबत त्याने न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

वाल्मिक कराडकडून न्यायालयात याचिका दाखल केली असल्याची माहिती आहे. वाल्मिक कराडने आपल्याला स्लीप ॲप्निया नावाचा आजार असल्याचा दावा केला आहे. ऑक्सीजनसारखं मशीन त्याला दररोज लावलं जात ते चालवण्यासाठी आपल्याला सीआयडी कोठडीत 24 तास मदतनीस देण्याची मागणी कराडने केली आहे. रुग्णाला अशावेळी ऑटो सीपॅप ही मशीन झोपताना लावली जाते. मशीन लावण्यासाठी मदतनीस हवा असल्याची न्यायालयाकडे विनंती केली आहे. या अर्जानंतर केज जिल्हा व सत्र न्यायालयाने सीआयडीला शासकीय वैद्यकीय सुविधा पुरविण्याचे सुचवले आहे, अशी माहिती आहे. 

वाल्मिक कराडकडून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे, वाल्मिक कराडने आपल्याला स्लीप ॲप्निया नावाचा आजार असल्याचा दावा केला आहे, सीआयडी कोठडीमध्ये 24 तास मदतनीस मिळावा अशी मागणी वाल्मिक कराडने न्यायालयाकडे केली आहे, वाल्मिक कराड मंगळवारी सीआयडी समोर शरण आला, त्याच्यावर खंडणीसोबतच बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा देखील आरोप आहे, दरम्यान त्याने शरण आल्यानंतर खंडणी प्रकरणात शरण आल्याचं त्यानी सांगितलं. त्यानंतर आता त्याने 24 तास मदतनीस मिळावे याची मागणी केली आहे. 

वाल्मिक कराड याने न्यायालयात त्याबाबतचा अर्ज केला आहे, त्यामध्ये आपल्याला स्लीप ॲप्निया नावाचा आजार असल्याचं त्याने म्हटलेलं आहे, त्याला रोज ऑक्सिजन सारखी एक मशीन लावली जाते, ती मशिन ऑक्सिजन नसून त्याला झोप येण्यासाठी लावली जाते, अशी माहिती आहे. ती मशीन लावण्यासाठी आणि इतर कामांसाठी 24 तास मदतनीस मिळण्याची मागणी वाल्मिक कराड यांनी न्यायालयाकडे केली आहे, आता न्यायालय याच्यावरती काय निर्णय देईल हे महत्त्वाचं ठरणार आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती