सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 राज्य

विंधणे येथील समस्या सोडविण्यासाठी वैजनाथ ठाकूर, कुंदा ठाकूर यांचे खासदार सुनिल तटकरे यांना साकडे

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    06-01-2025 10:43:10

उरण :  उरण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत विंधणे ह‌द्दीतील विंधणे येथील तलावाची संरक्षण भिंत नादुरुस्त झालेली आहे . तसेच तळ्यात गाळ साठल्यामुळे पाणी अस्वच्छ झाले आहे. तळ्याच्या मध्यभागी विहीर आहे. नळाला पाणी नसल्यावर विहिराचा पाणी पिण्यासाठी वापरण्यात येते. तसेच तलावाची संरक्षण भिंत दुरुस्ती करणे, तळ्यातील गाळ काढणे व गणपती विसर्जन घाट बांधणे आणि सुशोभिकरण करणे तसेच तळ्याच्या बाजूला जागा उपलब्ध आहे तेथे जेष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र आणि वाचनालयासाठी इमारत बांधणे आवश्यक आहे.या सदरच्या कामासाठी अंदाजे दोन कोटी रुपयाची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने जनतेच्या समस्या लक्षात घेत त्या सोडविण्याच्या दृष्टीने माजी जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट )चे उरण विधानसभा अध्यक्ष वैजनाथ ठाकूर व माजी जिल्हा परिषद सदस्य कुंदा वैजनाथ ठाकूर यांनी पुढाकार घेतला आहे.

वैजनाथ ठाकूर, कुंदा वैजनाथ ठाकूर यांनी सदर समस्या संदर्भात संसदिय पेट्रोलियम आणि नॅशनल गॅस कमिटी अध्यक्ष तथा खासदार सुनिल तटकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय मुंबई येथे भेट घेउन सदर समस्या मार्गी लावावी अशी मागणी तटकरे यांच्याकडे केली. यावेळी जनतेची महत्वाची समस्या लक्षात घेउन जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन संसदिय पेट्रोलियम आणि नॅशनल गॅस कमिटी अध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी वैजनाथ ठाकूर, कुंदा ठाकूर यांना दिले आहे. विंधणे ग्रामपंचायत हद्दीतील विविध समस्या आता मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाल्याने विंधणे ग्रामपंचायत,विंधणे ग्रामस्थांनी संसदिय पेट्रोलियम आणि नॅशनल गॅस कमिटी अध्यक्ष तथा खासदार सुनिल तटकरे,माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर, कुंदा ठाकूर यांचे आभार मानले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय मुंबई येथे या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उरण तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकूर तसेच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते,प्रमोद नवाले, विशाल पाटील कंठवली,आस्मक पाटील दिघोडे, मयुर पाटील दिघोडे,विंधणे ग्रुप ग्रामपंचायत सदस्य प्रमोद शेळके आदी मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.

 
 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती