सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 राज्य

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर; या दिवशी होणार मतदान, या तारखेला निकाल?

डिजिटल पुणे    07-01-2025 15:59:50

दिल्ली : गेल्या वर्षभरापासून चर्चेत असलेल्या दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर करण्यात आल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज मतदान आणि निकालाची तारीख जाहीर केली. दिल्ली विधानसभेसाठी ५ फ्रेब्रुवारीला मतदान होणार आहे तर ८ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे.  नव्या वर्षात दिल्लीत विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. दिल्लीत देशाचं चित्र एकवटलेलं पहायला मिळतं. प्रत्येक संस्कृतीचं दर्शन दिल्लीत होतं. त्यामुळे दिल्लीकर यावेळी उत्तम प्रकारे मतदान करतील अशी आशा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी व्यक्त केली.

निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत घेऊन दिल्ली विधानसभा निवडणुकीची आणि निकालाची तारीख जाहीर केली. ७० सदस्यांच्या दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ २३ फेब्रुवारीला संपतो आहे. २०२० मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा ६ जानेवारीला झाली होती. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार याबाबतची घोषणा करतील. १८ फेब्रुवारीला ते निवृत्त होणार आहेत.

देशाच्या अनेक राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये अनेक रेकॉर्ड तयार झाले. अनेक नवतरुणांनी लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभाग नोंदवला. आगामी काळात देखील लोकशाही मजबूत करण्यासाठी ही टक्केवारी अधिक वाढत जाईल. किंबहुना प्रत्येक निवडणुकीनंतर ईव्हीएमवर आरोप होतच राहतात. कुठल्याही यंत्रणेनं ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही. यंत्रणात चूक असेल, वैयक्तिक चूक असेल तर दाखवा, तत्काळ कारवाई करू. असेही केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटले आहे.

ईव्हीएम संदर्भातील आरोपांवर बोलतांना राजीव कुमार म्हणाले की, ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही, असे कोर्टानेही म्हटले आहे. त्यामुळे वायरस किंवा इतर यंत्रणांनी ईव्हीएम हॅक होऊ शकतो हा दावा पूर्णतः खोटा असल्याचे सांगत राजीव कुमार यांनी राज्यातील निवडणुकांवरील आरोपांवर उत्तर दिले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषद मध्ये ते बोलत होते. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे:

विधानसभा निवडणुकीची अधिसूचना कधी निघणार?- 10 जानेवारी

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख- 17 जानेवारी

उमेदवारी अर्ज छाननी करण्याची तारीख- 18 जानेवारी

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख- 20 जानेवारी

मतदानाची तारीख- 5 फेब्रुवारी

निकालाची तारीख- 8 फेब्रुवारी

दिल्ली विधानसभेच्या एकूण 70 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) भाजप आणि काँग्रेसला धोबीपछाड दिला होता. या निवडणुकीत 'आप'ने 70 पैकी 62 जागांवर विजय मिळाला होता. तर भाजपला अवघ्या 8 जागांवर विजय मिळाला होता. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये 'आप'ने दिल्लीत वर्चस्व राखले होते. मात्र, गेल्या पाच वर्षांमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया यांच्यासह 'आप'च्या प्रमुख नेत्यांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पक्षाची प्रतिमा काही प्रमाणात डळमळीत झाली आहे. याशिवाय, सलग 10 वर्षे सत्तेत असल्यामुळे सत्ताधारी'आप' विरोधात अँटी-इन्कम्बन्सी फॅक्टर निर्माण झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये आपने सलग दोनवेळा विजय मिळवला आहे. मात्र यावेळी आपला भाजपचं मोठं आव्हान असणार आहे. भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या दरम्यान काँग्रेस आणि आप बरोबर आहेत असं वाटत असतानाच अजय माकन यांनी अरविंद केजरीवाल यांना देशद्रोही असल्यांच वक्तव्य केलं. त्यामुळे दोन्ही पक्षांमधला वाद विकोपाला गेल्याचं दिसून येतं आहे. विद्यमान मुख्यमंत्री आतिशी यांच्याविषयी भाजपचे उमेदवार रमेश दिबुडी यांनी वादग्रस्त विधान केलं. त्यामुळेही दिल्लीचं राजकारण तापलं आहे. त्याला आतिशी यांनीही जशाच जसं उत्तर दिलं आहे. त्यामुळे या तिरंगी लढतीत आणि प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती