सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 जिल्हा

धक्कादायक!! मुंबईत आढळला HMPV चा रूग्ण; 6 महिन्यांच्या बाळावर उपचार सुरू

डिजिटल पुणे    08-01-2025 14:23:04

मुंबई : HMPV या नवीन पसरणाऱ्या विषाणूमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. आता मुंबईतील पवईमधील हिरानंदानी रुग्णालयात 6 महिन्यांच्या बाळाला HMPV लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. या बाळाची ऑक्सिजनची पातळी ८४ टक्क्यांपर्यंत घसरली होती. म्हणून त्याला १ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी सर्व तपासण्या केल्यानंतर त्याला विषाणूची लागण झाल्याचे समोर आले.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या या विषाणूवर कोणतेही औषध उपचार उपलब्ध आहेत. त्यामुळे बाळावर आयसीयूमध्ये ब्रॉन्कोडायलेटर्सच्या मदतीने उपचार केले जात आहेत. महत्वाचे म्हणजे, हिरानंदानी रुग्णालयाने याबाबत स्थानिक प्रशासनाला १ जानेवारीलाच कळवले होते. मात्र, बीएमसीच्या परळ येथील आरोग्य विभागाने अद्याप याबाबत कोणताही अहवाल प्राप्त झाला नसल्याचे म्हणले आहे.

दरम्यान, चीनमध्ये एचएमपीव्हीने हाहाकार माजवल्यामुळे भारतातही खबरदारी घेतली जात आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नेटवर्क लॅबोरेटरीजच्या नियमित तपासणीत काही प्रकरणे आढळून आली आहेत. इतकेच नव्हे तर, आरोग्य मंत्रालयाने या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि चीनमधील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी एक संयुक्त पाहणी पथक स्थापन केले आहे. हे पथक WHO कडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील उपाययोजना आखत आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती