उरण : आमदार संजयजी केळकर यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शाखा रायगड तर्फे उरण तालुक्यातील नविन शेवे शाळेचे मुख्याध्यापक हिराचंद म्हात्रे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.संय्यमी व शांत असा स्वभाव असलेले हिराचंद म्हात्रे यांनी नविन शेवे शाळेत आपल्या कार्याचा उत्तम ठसा उमटविला आहे.हिराचंद म्हात्रे यांचे शैक्षणिक क्षेत्रात महत्वाचे योगदान राहिले आहे.आपल्या उपशिक्षकांना हाताशी धरुन त्यांनी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले.याच त्यांच्या कार्याचा गौरव शिक्षक परिषदेने केला या वेळी राज्याध्यक्ष राजेश सुर्वे ,कोप्रोली केंद्राचे केंद्र प्रमुख बबन पाटील, शंकर म्हात्रे,वैभव कांबळे,नरेश मोकाशी ,निर्भय म्हात्रे, महेंद्र गावंड, म्हात्रे सरांचे कुटुंबीय प्रितेश व चेतन म्हात्रे उपस्थित होते.या वेळी हिराचंद म्हात्रे यांच्यावर उरण तालुक्यातील शिक्षकांकडून अभिनंदन होत आहे.व्हाट्सअप, फेसबुक आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.