सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 जिल्हा

ठाणे जिल्हा डिजिटल मिडिया संपादक - पत्रकार संघटनेची सभा संपन्न ;डिजिटल माध्यमातील संपादक-पत्रकारांच्या अडचणी सोडविणार - राजा माने

डिजिटल पुणे    09-01-2025 10:24:32

ठाणे : महाराष्ट्र राज्य स्तरावर डिजिटल मिडिया संपादक - पत्रकार संघटना कार्यरत असून ठाणे जिल्ह्यातील डिजिटल माध्यमात काम करणार्या संपादक आणि पत्रकारांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. डिजिटल माध्यमातील आपले न्युज पोर्टल आणि चॅनले हे अधिकृत व रजिस्टर करण्याबाबतच्या अडचणी सोडविण्यासाठी संघटना  तत्पर असून जास्तीत पत्रकारांनी पुढे यायला हवे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य डिजिटल मिडिया संपादक  - पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांनी पत्रकारांना मागर्दशन करताना केले. ठाण्यातील शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झालेल्या बैठकीत पत्रकार यतीन पवार यांची सचिवपदी तर सौरव डाके यांची प्रसिद्धीप्रमुखपदी नवीन नियुक्ती करण्यात आली. 

यावेळी ठाण्यातील पहिले डिजिटल रेडिओ चॅनल सुरू करणारे पत्रकार प्रसाद सकट यांनीही डिजिटल मिडिया नोंदणी करण्यापासून ते चालविण्यापर्यंत येणार्‍या अडचणी व शंकांचे निरसन केले. विशेष म्हणजे यावेळी ठाणे शहर विधानसभा आमदार संजय केळकर, पालघरचे आमदार राजेंद्र गावित, ठाण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने रावसाहेब यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. तसेच आमदार संजय केळकर व राजेंद्र गावित यांनी डिजिटल मिडिया संपादक आणि पत्रकार यांच्या संदर्भात ते काही प्रश्न असतील ते  येथे अधिवेशनात विधानसभेत मांडण्याचे आश्वासित केले.

बुधवारी दुपारी 12 वाजता ठाण्यातील शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र डिजिटल मिडिया संपादक - पत्रकार संघटनेच्या ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. 

संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रफुल वाघोले यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल माध्यमातील पत्रकारांच्या समस्या व अडचणींबाबत संघटनेचे महाराष्ट्र राज्य संस्थापक/ अध्यक्ष राजा माने यांनी मार्गदर्शन केले. तसेच पत्रकार उपाध्यक्ष अतुल पानसरे, संदीप लबडे, प्रसाद सकट यांनीही डिजिटल माध्यमातील उपस्थित सर्व पत्रकारांना मार्गदर्शन केले. ठाणे रेडिओ  हे डिजिटल मीडिया म्हणून मिनिस्ट्री ऑफ ब्रॉडकास्टिंग मध्ये रजिस्ट्रेशन झाल्या बद्दल व ठाणे मध्ये डिजिटल रेडिओ सुरू केल्या बद्दल डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष  राजा माने सर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र शासन राज्य अधिस्वीकृती समिती सदस्य विभव बिरवटकर, ठाणे पत्रकार संघाचे अध्यक्ष आप्पा वाळंज, ठाणे जिल्हा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे ठाणे अध्यक्ष प्रफुल वाघोले, उपाध्यक्ष अतुल पानसरे, सचिव यतीन पवार, खजिनदार गणेश कुरकुंडे, प्रसिद्धीप्रमुख सौरभ डाके, संदीप लबडे यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार प्रमोद खरात, प्रवीण सोनावणे, संजय भालेराव, गणेश थोरात, अर्जुन जाधव,  समीर मार्कंडे, दीपक कुरकुंडे, अशोक गुप्ता, अमर राजभर, अशोक घाग, विवेक कांबळे, दिपक कुरकुंडे, निलेश मंडलिक, सचिन देशमाने, मनोज सिंग, सिराज बेग, किशोर जाधव, दिनेश शिंदे, नम्रता सुर्यवंशी, संपदा शिंदे, जयश्री शेट्टी, अर्जुन जाधव, अनघा सुर्वे, वंशिका चाचे, सारीका साळुखे, योगिता लोहार, रुपाली कदम, नितीन दुधसागर, रोहित शिर्के, उमेश वांद्रे, विकास मिराशी, दिनेश कनोजिया, शुभम कवे, रितिक नाईके, शुभम कोळी, अमिता कदम, चंद्रकांत वाघमारे,  सागर पाटील,  अजय जाधव, प्रेम मोरे, अमित गुजर, संदीप खर्डीकर, अभिजीत भोसले, निखिल चव्हाण, सागर पाटील आणि सर्व पदाधिकारी, सदस्य, डिजिटल मीडियामध्ये कार्यरत असणारे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती