उरण : ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेच्या शिक्षकमित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे शैक्षणिक संकुल आवरे, तालुका – उरण, जिल्हा – रायगड येथील रामचंद्र म्हात्रे विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स या ठिकाणी मंगळवार दिनांक ०७ जानेवारी २०२५रोजी इयत्ता – दहावी व बारावी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना दहावी - बारावी नंतर पुढे काय ? या बाबतचे मार्गदर्शन मानव विकास संस्थेचे अध्यक्ष व उरण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रतिष्ठित डॉक्टर सुभाष घरत यांनी केले.
या मार्गदर्शनामध्ये इयत्ता दहावी व बारावी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेतील- बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर कोणकोणते अभ्यासक्रम आहेत, अभ्यासक्रम प्रवेश पात्र परीक्षा कोणत्या आहेत ? अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कोणत्या सेवासंधी उपलब्ध होतात? आपले आयुष्य योग्य मार्गस्थ होण्यासाठी कोणता अभ्यासक्रम निवडावा ? अशा अनेक बाबींवर विद्यार्थ्याना उद्बोधन केले. या मार्गदर्शनात त्यांनी स्वत:च्या जीवनातील अनेक अनुभव सांगून विद्यार्थ्यांनी आपले भवितव्य घडविण्यासाठी प्रयत्नाची कास धरावी अपयशाने खचून न जाता, अपयशावर मात करावी असे मौलिक विचार व्यक्त केले.या कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष ठाकूर, जेष्ठ शिक्षक शरद केणी , राजेंद्र शिंदे, शिवहरी गावंड, अध्यापक वर्ग, विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.