सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 पूर्ण तपशील

डॉक्टर तरुणी बलात्कार खून प्रकरण : संजय रॉय दोषी असल्याचं न्यायालयानं केलं जाहीर, सोमवारी ठोठावणार शिक्षा

डिजिटल पुणे    18-01-2025 18:45:25

कोलकाता :   कोलकाता इथल्या वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आल्यानं देशभर खळबळ उडाली. या प्रकरणी सियालदाह न्यायालयात सुनावणी पार पडली. या प्रकरणी आज सियालदाह न्यायालयानं आपला निकाल जाहीर केला. न्यायालयानं संजय रॉय याला डॉक्टर तरुणी बलात्कार आणि खून प्रकरणी दोषी घोषित केलं आहे. सोमवारी या प्रकरणात दोषी संजय रॉय याला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.

 कोलकाता इथल्या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करुन तिचा खून केल्याची घटना 9 ऑगस्टला घडली. या घटनेमुळे देशभरातील डॉक्टरांनी आंदोलन केल्यानं प्रकरण चांगलंच चिघळलं. त्यानंतर 9 जानेवारी 2025 ला सियालदाह न्यायालयानं या प्रकरणी 18 जानेवारीला निकाल जाहीर करणार असल्याची घोषणा केली. आज या प्रकरणी न्यायालयानं निकाल जाहीर केला. या निकालानुसार संजय रॉय याला न्यायाधीशांनी दोषी ठरवलं आहे. संजय रॉय याला सोमवारी शिक्षा जाहीर करण्यात येणार असल्याचं न्यायाधीशांनी स्पष्ट केलं. निकाल जाहीर केल्यानंतर 24 तासाच्या आत शिक्षा जाहीर करण्यात येते. मात्र उद्या रविवार असल्यानं सोमवारी शिक्षा ठोठावण्यात येणार असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं.

 कोलकाता इथल्या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात9 ऑगस्ट 2024 रोजी डॉक्टर तरुणीचा मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली. वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागाच्या चौथ्या मजल्यावरील एका सेमिनार हॉलमध्ये डॉक्टर तरुणीचा मृतदेह आढळून आला. डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचं वैद्यकीय अहवालावरुन स्पष्ट झालं. या प्रकरणी सुरुवातीला कोलकाता पोलिसांनी तपास केला. तत्कालीन महापौर विनीत गोयल यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही रुग्णालयाला भेट दिली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडं सोपवण्यात आला.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती