जळगाव : जळगाव येथे मुंबई - अमरावती एक्सप्रेसचा अपघात झाला आहे. यावेळी एका ट्रकने रेल्वेच्या इंजिनला जोरात धडक दिली आहे. बोदवड रेल्वे स्थानकावर हा अपघात झाल्याचे कळते आहे. त्यामुळे या अपघाताने भीतीचे वातावरण पसरले आहे. ळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्थानकाच्या जवळ सकाळी 4.30 च्या सुमारास मुंबई-अमरावती एक्सप्रेस समोर धान्याने भरलेला ट्रक आल्याने मोठा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, संपूर्ण ट्रकचा चक्काचूर झाल आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड नाढगावजवळ रेल्वे गेट तोडून एक धान्याने भरलेला एक ट्रक आधीपासून अडकून पडला होता. पण रेल्वेचालकाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे रेल्वेचा स्पीड कमी होता.जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात घडला. रेल्वे क्रॉसिंग गेट तोडून धान्याने भरलेला ट्रक थेट ट्रॅकवर आल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. त्याच वेळी मुंबई-अमरावती एक्सप्रेस त्या मार्गावरून जात होती आणि ट्रकला जोरदार धडक बसली. मात्र, रेल्वेचा वेग कमी असल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे
अद्याप या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी पोहचविण्याचे काम सुरू झाले आहे. पहाटे 4 वाजेपासून मुंबई-हावडा मार्गावरील अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अपघातामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती आहे.
बोदवड रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघातामुळे मुंबई हावडा मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. यावेळी काही प्रमाणात नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे. नक्की सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड होता का याचीही माहिती काढली जाते आहे. नागपूर आणि हावडाकडे जाणाऱ्या अनेक गाड्या भुसावळ-जळगाव रेल्वे स्थानकावर थांबवल्या तर हावडा-नागपूरकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या मलकापूर व अकोला रेल्वे स्थानकावर थांबवल्या. गेल्या तीन तासांपासून रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवासाचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अपघातस्थळी रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अपघात घडल्यानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिस आणि रेल्वे प्रशासन त्याचा शोध घेत आहेत. हा ट्रक कोणाचा होता? तो नियमबाह्य मार्गाने का गेला? याचा तपास सुरू आहे. मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर सकाळी 4 वाजल्यापासून रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. अनेक गाड्या उशिराने धावत असून प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. रेल्वे प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन पथकाला तातडीने पाचारण करून मार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू केले.