सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 जिल्हा

महिलांची आरोग्य तपासणी व औषधे वाटप

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    14-03-2025 17:44:51

उरण : उरण मेडीकल वेल्फेयर असोसिएशन व आयुर्वेद व्यासपीठ उरण शाखे तर्फे आंतराष्ट्रीय महीला दिना निमित्त डाउरनगर उरण येथील आंगणवाडी मध्ये महीलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर व औषधे वाटप हा कार्यक्रम घेण्यात आला.याचा लाभ ९० हून अधिक महिलांनी घेतला.यासाठी डाॅ हेमलता वैशंपायन,डाॅ दया परदेशी,डाॅ प्राजक्ता कोळी,डाॅ सविता ढेरे यांनी रूग्ण तपासणी करुन औषधे दिली.या उपक्रमाचे उत्तम असे व्यवस्थापन श्लोक पाटील ( माई फांउडेशन, कलश फांउडेशन) व  कल्पना सुर्वे ( स्व.तृप्ती सुधीर सुर्वे फांउडेशन)यांनी केले.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती