सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
  पर्यटन

चारधाम प्रवास वर्णन, भाग ६४ - उमेश कुगांवकर, ठाणे

उमेश कुगांवकर    09-09-2021 08:38:59

उमेश कुगांवकर 

भाग ६३ पासून पुढे

 

आम्हाला  गौरीकुंड हुन केदारनाथ कडे जायचे होते..

   पण त्या अगोदरच आम्हाला सोनप्रयाग लागले बहुतेक सर्व बसेस येथे  थांबतात. तेथे तशी जागाही आहे. मोठा विलोभनीय दृश्य असते  ते!!

    सोनप्रयाग...

 

सोनप्रयाग..

   केदारनाथ च्या अगोदर... विश्रांतीचे ठिकाण...

तेथून थोड पुढे गेलो तर आम्हाला नारायण कोटी लागले. येथे तुम्हाला हेलिकॉप्टरने केदारनाथ कडे जाता येते.. त्यासाठी अगोदर बुकिंग आवश्यक आहे. ज्यांच्याकडे वेळ कमी आहे, आणि चार पैसे जास्त आहेत अशा लोकांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा किंवा शारीरिक काही अडचणी असल्यास हेलिकॉप्टरने अवश्य प्रवास करावा.. तेवढीच वेगळी मजा  करायला काय हरकत आहे... आणि आल्या नंतर परत 'हेलिकॉप्टरने गेलो होतो ' असा रुबाब ही मारू शकतो. त्यात सुद्धा एक वेगळाच रुबाब, ऐश्वर्याची  लक्षण,

 आणि वेळेची बचत हे फायदे आहेतच. गौरीकुंड ते केदारनाथ साधारण पंधरा वीस किलोमीटरचा प्रवास तुम्ही चालत किंवा घोडा, कंडी ने कळणार त्यापेक्षा या सुविधाचा अवश्य लाभ घ्यावा असं माझं प्रामाणिक मत आहे. शेवटी ज्याची त्याची इच्छा.!!

 

हेलिकॉप्टर सेवा

 यात्रेकरूंसाठी उपलब्ध आहेच.

अगदी केदारनाथ मंदिराच्या परिसरापासून दहा ते पंधरा मिनिट चालत जाण्याच्या अंतरावर आहे. तेथेसुद्धा हेलिपॅड ची सुविधा आहे.

आता तर नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून चारधाम यात्रे तील रस्ते आणि सुविधा वाढतच आहेत आणि पुढे तर ही यात्रा अधिक सुलभ होईल. यात शंका नाही.

आता आम्हाला गौरीकुंड चे वेध लागले होते. कारण इथूनच केदारनाथ  'पैदल यात्रा 'सुरू होते.

 सर्व वाहन इथपर्यंतच येतात.

 नंतर मग... चले चलो... किंवा चलते रहो अशीच परिस्थिती असते.

 घोडेवाले... जाणारे येणारे... कंडी वाले जाणारे येणारे... शिवाय चालत जाणारे येणारे यात्रेकरू यांची एकच गर्दी आणि सळसळता उत्साह असा एक वेगळाच 'माहोल'

 गौरीकुंड इथं तयार होतो. त्यामुळे या स्थानाला अतिशय महत्त्व आहे?

  का आहे महत्व?

 

क्रमशः

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती