उमेश कुगांवकर
भाग ६४ पासून पुढे
गौरीकुंड....
आपल्या पुराणात सांगितल्याप्रमाणे इथच पार्वती मातेने शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी महान तपश्चर्या केली होती. त्यामुळे शंकर पार्वतीचा विवाह संपन्न झाला होता. आणि पार्वती स्नान करीत असताना गणेश पार्वती चा रखवालदार च होता. गणेशाने शंकराला रोखणे... शंकराने गणेशाचा वध करून त्याला हत्तीचे तोंड बहाल करणे...
अशी ती कथा आपणा सर्वांच्या परिचयाची आहे तिच स्थानही गौरीकुंड आहे असंही म्हणतात.
इथं गरम पाण्याचे कुंड असल्याने चालत जाणारे यात्रेकरू या गरम पाण्यात आपले पाय स्वच्छ करून किंवा आंघोळ करून पुढे जातात..
यात्रेकरूंचा
जल्लोष...
पाहायला सुद्धा मजा येते....
क्रमशः