सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
  पर्यटन

चारधाम प्रवास वर्णन, भाग ६६ - उमेश कुगांवकर, ठाणे

उमेश कुगांवकर    11-09-2021 08:05:12

भाग ६५ पासून पुढे

केदारनाथ मंदिर

   उत्तराखंड मध्ये हे मंदिर आहे.

 उत्तराखंड मधील चारधाम यात्रेमध्ये

 यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ आणि बद्रीनाथ अशी यात्रा होते. आठव्या शतकात हे मंदिर उभारले असं म्हणतात. पुढे याच शतकात  शंकराचार्य यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला.

  क त्यू री   शैलीत हे मंदिर बांधले आहे. सहा फूट उंच असा एकसंघ  असा चौथरा आहे. भारतातील बहुतेक मंदिर पूर्व-पश्चिम असतात... पण हे मंदिर अपवाद आहे. ते उत्तर दक्षिण आहे. हेच त्याचं वैशिष्ट्य!

   मंदाकिनी नदीच्या किनारी हे मंदिर आहे.

   अक्षय तृतीया या दिवाशी कपाट उघडतात. ( दरवाजा). आणि दिवाळीत भाऊ बीज दिवशी कपाट बंद करतात.

 

केदारनाथ  चा परिसर अतिशय रमणीय आहे. कधी कधी बर्फ सुद्धा कमी जास्त प्रमाणात पहायला मिळतो. इतकेच नव्हे तर कधीकधी लहान मोठ्या glacier ला सुद्धा ओलांडून जावे लागते..

 पण त्यातही मजा येते. एक वेगळा अनुभव असतो. तो घ्यायला काय हरकत आहे. थोडासा 'थ्रील ' असावच प्रवासात..

अशा प्रकारच्या बर्फातून सुद्धा लोक आपला  काढीत असतात. त्यात चालणानारे

 घोडेवाले, कंडी वाले, जाणारे येणारे आपला मार्ग काढीत असतात. अगदी स्वतःलाही सुरक्षित ठेवून.

अति उंचीमुळे काही लोकांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे त्रास होतो... म्हणून सरकारने ऑक्सिजनची सुद्धा  व्यवस्था केलेली आहे. एखादा सिलेंडर आपल्या जवळ ठेवावा. नको असल्यास कुणाला तर देऊन टाकावा. एवढच सत्कर्म आपल्याकडून होईल. रात्रीच्या वेळी थंडी मात्र खूपच असते. ब्लॅंकेट्स तोंडावरून घेतले तर आप जीव गुदमरतो, नाही घ्यावे तर थंडी वाजते... मोठी विचित्र परिस्थिती असते... तरीही आपणच  मार्ग काढला पाहिजे.

गौरीकुंड ते केदारनाथ साधारण सतरा अठरा किलोमीटरचा प्रवास आहे. रस्ताही असाच अजगरासारखा पसरलेला असतो. त्यामुळे काही जणांना रस्ता पाहूनच घाम फुटतो.

गौरीकुंड हुन जे लोक चालू शकत नाहीत त्यांच्यासाठी 'कंडी' उपलब्ध असतात.. त्यांचे 'रेट' सुद्धा सरकारने ठरविलेले आहेत. त्यामुळे 'घासाघीस ' हा प्रकार इथं नाहीच. एकटा माणूस किंवा चार माणसं तुम्हाला घेऊन जातात. आपण आपली सोय पहायची..

 आणि मार्ग काढायचा....

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती