सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
  पर्यटन

अष्टविनायक (प्रवास वर्णन) ,उमेश कुगांवकर ,ठाणे

MSK    15-09-2024 15:49:15

अष्टविनायक (प्रवास वर्णन)

भाग १ क्रमश: 

,उमेश कुगांवकर ,ठाणे

 

आपल्या महाराष्ट्रात पंढरीचा वारी प्रत्येकांनी एकदा तरी करावी असे म्हणतात अगदी त्याच प्रमाणे मी तर असे म्हणतो की आपल्याहाराष्ट्रातील “ अष्टविनायक यात्रा “ आपल्या पैकी बर्याच लोकांनी केली असेलही,नसेल तर आवश्य ही यात्रा कराच आणि त्यातीलआनंद ,समाधान,निसर्ग ,भक्ती भाव आणि जाननाचे आशिर्वाद याचा लाभ ही घ्यावा ,अगदी आपल्या सर्व परिवारा रोबर

 

नुकतीच आम्ही ही यात्रा ,, ॲागष्टला पूर्ण केली . श्रावण महिना सुरू झाला होता .पावसाळा ही सुरू झाला होता आणि सर्व धरतीहिरव्यागार रंगाने उजळून निघाली होती.शनिवार रविवार सुटीचा दिवस चाळून आम्ही मुद्दाम मंगळवार,बुधवार ,गुरूवारी ही अष्टविनायकयात्रा पूरण केली,त्यामुळे कुठेही गर्दीचा त्रास  होता सर्व गणे दर्शन सुरळीत पार पडले.

निसर्गाचा आनंद मनमुराद लुटता ला.प्रत्येकाने भरपूर ॲाक्सिजन मनात आणि ह्रदयात ठासून भरून घेतला .जो पुढेचे कित्येक दिवसअगदी सहज जीवन जगायला पुरेल .( आठवणीच्या रूपाने अर्थात )

 

मुबंईतील आसनगाव जवळील शहापूर येथील स्वामी समर्थ मठ आणि मठातील भजनी मंडळ महिला गटाने ही अष्टविनायक यात्रेचीसंकल्पना उचलून धरली .आणि राजश्री दामोदर यांनी पुढाकार घेवून आम्ही यात्रेला निघालो ते शहापूर येथून आणि शेवट पण शहापूरलाच झाला.

आमच्या ट्रॅव्हलर बस मधे आम्ही चार पुरूष आणि आठ महिला होत्या .बहुतेक सर्व साठी पार केलेले र्यापैकी यात्रेकरू होते .

 

साधारण सकाळी .३० वाजता आमची  शहापूरहून निघाली आणि आसनगाव स्टेशनहून मुरबाड,कर्जत मार्गे आम्ही लोणावळा,खंडाळा जवळील पळसधारी गावातील श्री स्वामी समर्थ महाराज मठात प्रथम दर्शन घेतले आणि स्वामी समर्थाचा जयजयकार केला.

 

पळसधरी येथून निघाल्यानतंर आम्ही पाली च्या पहिल्या अष्टविनायक दर्शनाला निघालो.



क्रमश:


 लोकांच्या प्रतिक्रिया

Digital Pune
रा ज श्री दा मो द र श हा पू र, ठाणे.
 15-09-2024 18:43:17

अरे वा , उमेश सर तुम्ही तर आपली अष्टविनायक यात्रा जगापर्यंत पोहचण्याचा निर्धार केला अस वाटते तुमच्या। या उपक्रमाला आमच्या कडून खूप खूप शुभेच्छा आणि असेच छान प्रवास वर्णन लिहित रहा. ही स्वामी चरणी प्रार्थना.

 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती