सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
 पूर्ण तपशील

सहकारी संस्थेचा कायदा सदर क्रमांक : ००२ (प्रश्न आणि उत्तरे)

जगदीश काशीकर    05-03-2022 12:52:44

विषय: प्राधिकरणातील एका रजिस्टर्ड संस्थेमध्ये रजिस्टर्ड करारनामा करून घर घेतले आहे. त्यास प्राधिकरणाने 'ना हरकत' दाखला दिला आहे व आमच्या नावाने हस्तांतर आदेश दिला आहे. त्यानंतर सोसायटीमध्ये आमच्या नावावर सभासदत्व दिले आहे. घरपट्टी, पाणीपट्टी, वीज मीटर इत्यादी माझ्या नावावर हस्तांतरित झालेले आहे. तरी आता तलाठी यांच्या कार्यालयात जुने सभासद त्यांच्या जागी माझे नाव येण्यास काय करावे लागेल? सिटी सर्वे ऑफिस मध्ये माझ्या  नावाची नोंद होण्यास काय करावे लागेल?

 

उत्तर: स्थावर मालमत्ता खरेदी केल्यानंतर बऱ्याचशा बाबींची आपल्याकडून पूर्तता झालेली दिसते. स्थावर मालमत्ता खरेदी केल्यानंतर सरकारदरबारी आपल्या नावाची मालक म्हणून होणे अत्यंत आवश्यक असते. घरपट्टी, पाणीपट्टी, वीजमीटर व बिल आपल्या नावावर हस्तांतरित झाले असले तरी या गोष्टी जागेची मालकी निर्देशीत करत नाहीत.

 

प्राधिकरणाच्याबाबतीत वेगळा कायदा लागू होतो व प्राधिकरणाच्या दप्तरी मालकी किंवा भाडे पट्टेदार म्हणून झाली की आपली मालकी प्रस्थापित होऊ शकते. तसेच, तलाठी ऑफिसमध्ये व सिटी सर्वे ऑफिसमध्ये नोंद करायची असल्यास करारनाम्याची प्रत व प्राधिकरणाचे हस्तांतरणाचे पत्र विहित नमुन्यातील अर्जासोबत दिल्यास आपल्या नावे मालकी हक्काची नोंद होऊ शकते.

 

लेखकः- अॅडव्होकेट-श्री. नितीनजी कांबळे सो.

पुस्तकाचे नांव:- सुरक्षित माझे घर 

शब्दांकन व प्रसारण:- श्री. अमरनाथ स. शेणेकर, कोल्हापूर

7350201000, 8459348218 सहकार कायदा म्हणजे सोसायटी, संस्था, गृहनिर्माण, इंडस्ट्रीअल संस्था आश्या अनेक क्षेत्रात या कायद्याची व्याप्ती वाढलेली आहे. यामध्ये जनरल सभेचे ठराव, मासिक मिटींग, AGM, प्रोसिडींग अनेक विषयी माहिती आपणास येथून पुढील लेखात मिळेल त्याचा व्यवस्थीत अभ्यास करून विषय अध्यायन करावेत, 

सूचना;- आपण जमा केलेले पुरावे, उत्तारे, दस्तऐवज, कागदपत्रे, इत्यादी निष्णात वकिलांस दाखवून त्यांचा सल्ला घ्या.

 

आपण हे पुस्तक अेमेझॉन वेबसाइटवर खरेदी करू शकता.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती