सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • पुण्यात पीएमपाएल ची सेवा रात्रभर सुरू राहणार
  • अजित पवारांना मोदी शाहाच्या दयेवर जगावे लागेल : वड्डेट्टीवार
  • भाजपाचे नितीन गडकरी,देवेंद्र फडवणीस ,चंद्रशेखर बावनकुळे ,दानवे यांचे कडे विधानसभा निवडणुकांचे नेतृत्व
  • काहीना देव झाल्यासारखे वाटते : मोहन भागवत
 शहर

पूर परिस्थितीला पुणे महानगरपालिका व पाटबंधारे विभाग जबाबदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

डिजिटल पुणे    25-07-2024 17:32:43

पुणे : काल रात्रीच्या पावसामुळे सिंहगड रोड ते पुलाची वाडी संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला. अनेक सोसायट्यांची पार्किंग, नागरिकांच्या गाड्या पाण्याखाली गेल्याच परंतु इमारतींच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या नागरिकांच्या घरातही पाणी शिरले. हजारो नागरिकांच्या दुकानांमध्ये पाणी घुसल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या सर्व मराठी माणसांच्या नुकसानीला पुणे महानगरपालिका, पाटबंधारे विभाग, पुणे जिल्हाधिकारी व भारतीय जनता पार्टीने पुणे शहराची लावलेली विल्हेवाट जबाबदार आहे. 

नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली नदीपात्राची रुंदी कमी करून नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण करण्यात आला.  यामुळे पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात पाण्याचा फुगवटा निर्माण झाला आहे. आज झालेल्या प्रलायाची संपूर्ण जबाबदारी स्वतःला पुणे शहराचे शिल्पकार म्हणवून घेणारे देवेंद्र फडणवीस व त्यांना मुकाट्याने साथ देणारे मुरलीधर मोहोळ यांची आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आला. 

संपूर्ण रात्र मुसळधार पाऊस सुरू असताना, प्रचंड प्रमाणात धरणातून विसर्ग केला जात असताना पुणे जिल्हाधिकारी श्री. सुहास दिवसे व महानगरपालिका आयुक्त श्री. राजेंद्र भोसले काय करत होते असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी उपस्थित केला. पाण्याची पातळी वाढत असताना सायारन वाजवून, भोंग्याद्वारे सूचना देऊन नागरिकांना सतर्क करणे मी महानगरपालिकेची जबाबदारी होती. असे असतानाही महानगरपालिका आयुक्त सकाळी ७ वाजेपर्यंत निष्क्रीय होते, म्हणून त्यांची राज्य शासनाने तातडीने बदली करावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुणे शहराच्या या परिस्थितीला कोण जबाबदार आहे याचं उत्तर पुणेकरांना द्यावं अशी मागणी प्रशांत जगताप यांनी केली.

पुराने बाधीत भागात त्वरित पंचनामे करून नागरिकांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. पुणे शहरात पावसाळापूर्वी कोणकोणती कामे पूर्ण करण्यात आली, कोणती कामे शिल्लक राहिली ? का शिल्लक राहिली ? सर्व कामे पूर्ण झाली असा जर महानगरपालिकेचा दावा असेल तर पूर परिस्थिती का निर्माण झाली ? या प्रश्नांची उत्तर पुणे महानगरपालिका आयुक्तांनी द्यावीत अशी मागणी प्रशांत जगताप यांनी केली.

यापुढे अशी परिस्थिती निर्माण होऊ नये याकरिता संबंधित खात्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश व्हावेत तथा ज्यांचे नुकसान झाले आहे त्या नागरिकांना योग्य ती नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह किशोर कांबळे, शेखर धावडे, गणेश नलावडे, स्वातीताई चिटणीस, अप्पा जाधव, किरण गाडेकर आदि उपस्थित होते.

कळावे !

आपला

प्रशांत सुदामराव जगताप

पुणे शहराध्यक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती