सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
  • समाजसेवा करण्याचा सल्ला केजरीवाल यांनी मानला नाही : आण्णा हजारे
 शहर

राजकीय पक्षांचा गुंतवणूकदारांना पाठिंबा ;अन्यथा डीएसके चे गुंतवणूकदार दाखवणार काळे झेंडे !

डिजिटल पुणे    06-09-2024 17:10:30

पुणे : डी एस कुलकर्णी यांच्या कंपन्यात ठेवी बुडलेल्या गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी स्थापन झालेल्या चैतन्य सेवाभावी संस्था (असोसिएशन ऑफ डीएसके फ्रॉड व्हिक्टिम्स) ने हिंदू महासंघाच्या सहकार्याने मेळाव्याचे आयोजन केले होते.दि ६ सप्टेंबर रोजी दुपारी  १.३० वाजता श्रमिक पत्रकार संघ सभागृह येथे हा मेळावा झाला.  हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे, राष्ट्रवादी पक्ष  (शरदचंद्र पवार )चे शहराध्यक्ष प्रशांत जगताप , शिवसेना(उध्दव ठाकरे) पक्षाचे  माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार,एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते अभिजित बोराटे  उपस्थित राहिले. त्यातून राजकीय पक्षांचा गुंतवणूकदारांना पाठिंबा मिळाला.पुढील आक्रमक आंदोलनाची दिशा जाहीर करण्यात  आली .

'डीएसके प्रकरणात सर्व यंत्रणा कडून सर्वसामान्य व्यक्तींना गृहित धरले जात आहे.आपलेच पैसे मिळविण्यासाठी गुंतवणूकदारांना यातायात करावी लागते. राजकीय पक्षांनी गुंतवणूकदारांना न्याय देण्यासाठी हालचाली केल्या नाहीत तर गणेशोत्सवानंतर सर्व राजकिय पक्षांच्या कार्यक्रमांना काळे झेंडे घेऊन  उपस्थित राहून गुंतवणूककार हा मुद्दा मांडतील. चर्चा झाल्याशिवाय हे गुंतवणूकदार सभास्थान सोडणार नाहीत.जे पक्ष आज गुंतवणूकदारांच्या व्यथा ऐकायला आले नाहीत, त्यांची यादी लक्षात ठेवली पाहिजे.आम्हाला न्याय मिळाला नाही तर विधानसभा निवडणुकीत ताकद दाखवून देऊ' असा इशारा  हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी दिला. 

प्रशांत जगताप म्हणाले, ' गुंतवणूकदारांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस चा पाठिंबा आहे.आंदोलनात सातत्य असेल तरच यश मिळेल.न्यायप्रविष्ट गोष्ट आहे, म्हणून सत्ताधारी पक्षांनी दुर्लक्ष करू नये.पडद्यामागे काही घडत असेल, तर लक्ष ठेवले पाहिजे.आचारसंहितेपूर्वी गुंतवणूकदारांच्या हिताचा निर्णय झाला पाहिजे. शिवसेना(उध्दव ठाकरे) पक्षाचे   माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार म्हणाले, ' गुंतवणूकदारांच्या लढाईला शिवसेना(उध्दव ठाकरे) पक्षाचा पाठिंबा राहिल. डीएसके यांच्या मालमत्तेचे मूल्यांकन,लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता राहिली पाहिजे. तरच गुंतवणूकदारांना न्याय मिळेल.पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पावले उचलली जातील'.

शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे अभिजित बोराटे म्हणाले, 'गुंतवणूकदारांच्या विषयाला कोणीच हात घालत नाही, ही चिंतेची गोष्ट आहे.आमचे सरकार कोणाचाही रुपया बूडू देणार नाही. डिएसके यांचे व्यवसाय बंद असतील तर ते गुंतवणूकदारांचे पैसे परत देऊ शकतील असे नाही, मात्र सरकार  जबाबदारी झटकणार नाही. येत्या आठवडयात मुख्यमंत्र्यंाची आणि गुंतवणूकदारांची  भेट करुन दिली जाईल'.गुंतवणूकदारांचे प्रतिनिधी नितीन आडुळकर म्हणाले, ' ज्यांच्याकडे पैसे गुंतवले , ते पैसे द्यायला तयार आहेत. सरकारच्या ताब्यात मालमत्ता आहेत, पण गुंतवणूकदारांना पैसे मिळायला नाहीत, हे दुर्देव आहे.गुंतवणूकदारांना सापत्न भावाची वागणूक देऊ नये. सरकारला स्वतःचे पैसे आम्हाला द्यायचे नाहीत.'चैतन्य सेवाभावी संस्थेचे दीपक फडणीस म्हणाले ' गुंतवणूकदारांची एकजूट अभेद्य आहे. अजून राजकीय व्यक्तींनी आम्हाला सहानूभूती दाखवली नाही'.सीए आदिती जोशी यांनी आर्थिक बाबींवर प्रकाश टाकला. 

 विद्या घटवाई यांनी  सूत्रसंचलन केले.स्वागत व प्रास्ताविक  यांनी मनोज तारे यांनी केले.आभार नितीन शुक्ल यांनी मानले.हिंदू महासंघ कडून सीए आदिती जोशी,अॅड निता जोशी,  अविनाश बोराटे,चैतन्य सेवाभावी संस्थेचे तसेच गुंतवणूकदार मोठया संख्येने उपस्थित होते. 


 लोकांच्या प्रतिक्रिया

Digital Pune
उल्हास रा. काठाळे
 06-09-2024 21:12:49

ठेवीदारांचे पैसे घामाचे, स्वकष्टाचे आहेत ते मिळालेच पाहिजेत.

Digital Pune
जयप्रकाश लक्ष्मीकांत अग्निहोत्री.
 06-09-2024 21:54:26

समस्येविषयी सहानुभूती सर्व राजकीय पक्षा कडून मिळत आहे. तसेच कायदेशीर मार्गाने ( न्यायालया मार्फत ) सातत्याने प्रयत्न चालू आहेत. यामुळे यशाची खात्री वाटते. धन्यवाद !!!

Digital Pune
हेमंत स. बोराटे
 06-09-2024 22:23:00

येत्या विधानसभा इलेक्शन मध्ये जे राजकीय पक्ष त्यांच्या जाहीर नाम्यात डी. एस. के च्या फ. डी. होल्डर्स / गुंतवणूक दारांना त्यांचे पैसे मिळवून देण्याची हमी देतील त्यांनाच मतदान करावे. अन्यथा ते नक्कीच राजकीय भांडवल करत आहे असे समजावे .

Digital Pune
सुरेश लक्ष्मण मालशे
 06-09-2024 22:32:19

खासगी क्षेत्रात काम करीत असल्यामुळे, निवृत्तीनंतर आर्थिक चणचण कमी व्हावी, अवलंबून राहू लागू नये म्हणून केलेली सोय, जीवघेणी ठरत आहे. अनेक ताण सहन करणे कठीण झाले आहे. व्याधी जडल्या आहेत तरी मायबाप सरकारने त्वरीत लक्ष घालून ठेवीदारांचे पैसे मिळवून द्यावेत.

Digital Pune
Mrs Anuya Suryakant Deshmukh
 06-09-2024 22:44:37

I am the FD holder and had invested the retirement amount of my husband.We are quite in difficult situation.I hope the Govt.will do the needful for us so that we will spend our old days in peace.

Digital Pune
अनिल कुलकर्णी
 07-09-2024 00:02:27

गेल्या 7 वर्षापासून आपली संस्था पीडीत गुंतवणूकदारांचे पैसे यरत मिळवुन देण्याचा प्रयत्न करत आहे. कोर्टाची प्रोसिजर कंटाळवाणी असते पण आपण धीर सोडला नाही. या मध्ये अनेकांकडून सहकार्य मिळाले. पण आता राजकारणी मंडळीही आपल्या दुःखात सहभागी होत आहेत ही आश्चर्यकारक बाब आहे. आपण 7 वर्षे लढा दिला तेव्हा या पैकी एकाही पक्षाने साधी दखलही घेतली नाही व आता निवडणुकीच्या तोंडावर कां होईना आपल्या आंदोलनाची दखल घेण्यास ते पुढे आले हेही थोडके नसे. पण या राजकारण्यांवर जास्त भरवसा ठेवू नका. आम्ही सर्व जण फडणीसांचे मागे खंबीरपणे उभे आहोत. धन्यवाद

Digital Pune
श्रीपाद गोपाळ बोपर्डीकर
 07-09-2024 11:41:25

आपण सर्वांनी आम्हाला मदत केली तरच आमचे पैसे मिळतील हीच आमची आपल्याकडून अपेक्षा आम्ही पण आपल्या अपेक्षा पूर्ण करू

Digital Pune
Arun Kulkarni
 07-09-2024 18:31:49

फास्ट ट्रॅक कोर्टात वर्षानुवर्षे जर एखादी केस चालत असेल तर त्याला फास्ट ट्रॅक कोर्ट कसे म्हणता येईल

Digital Pune
संदीप कृष्णराव जालीहाळ
 07-09-2024 19:53:31

सर्व एवढी होलदरांचे लवकरात लवकर पैसे मिळावेत यासाठी राजकीय दबाव आणणे जरुरीचे आहे

 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती