सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
  • समाजसेवा करण्याचा सल्ला केजरीवाल यांनी मानला नाही : आण्णा हजारे
 शहर

बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये सौंदर्य तज्ञ राहुल फाटे यांच्या 'सौंदर्याच्या गुजगोष्टी'

डिजिटल पुणे    07-09-2024 12:50:06

पुणे: पुणे  जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील विद्यार्थिनी मंचच्या वतीने महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी प्रख्यात सौंदर्य तज्ञ राहुल फाटे यांच्या 'सौंदर्याच्या गुजगोष्टी' या विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या उप प्राचार्या डॉ. वंदना पिंपळे, वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ. चंदा हासे, विद्यार्थिनी मंच समन्वयक प्रा. रुपाली रसाळे उपस्थित होते.
 
आपल्या मनोगतात प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांनी विद्यार्थिनी मंचद्वारे आयोजित या  उपक्रमाची संकल्पना स्पष्ट करत विद्यार्थिनींनी विद्यापीठ अनुदान आयोग व राष्ट्रीय कौशल्य पात्रता रचना (NSQF) यांच्या कौशल्याधारित अभ्यासक्रमांकडे वळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
 
'सौंदर्याच्या गुजगोष्टी' या विषयावर उपस्थित विद्यार्थिनींशी संवाद साधत असताना सौंदर्य तज्ञ राहुल फाटे यांनी सर्वप्रथम ब्युटी थेरपी विषयातील विविध मुलभूत गोष्टींची सविस्तर माहिती देत काळानुरूप सौंदर्य क्षेत्रात होत असलेल्या बदलानुरूप स्वतःला अद्ययावत ठेवण्याची गरज असल्याचे नमूद केले. तसेच उपस्थित विद्यार्थिनींनी विचारलेल्या विविध प्रश्नांना अभ्यासपूर्ण उत्तरे देत त्यांच्या ज्ञानात भर घातली.
 
महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित या कार्यक्रमासाठी सुमारे ९० पेक्षा जास्त विद्यार्थिनी उपस्थित होत्या. डॉ. सुवर्णा खोडदे यांनी सूत्रसंचालन तर डॉ. जितेंद्र वडशिंगकर यांनी आभार व्यक्त केले. यशस्वितेसाठी विद्यार्थिनी मंचच्या प्रा. प्रीती जोशी, प्रा. शीतल नलावडे, प्रा. गुरुदेवी स्वामी, प्रणित पावले, तेजस्विनी नायकवडी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती