सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • आपल्या आतिशी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री
  • चंद्रकांत दादा यांच्या ताफ्यातील गाडीला मद्यधुंद कार चालकाने दिली धडक.,चंद्रकांत दादा सुखरूप
  • आज सकाळी दगडूशेठ गणपतीची अजित पवार यांचे हस्ते पूजा
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
 शहर

पुण्यातील लैंगिक अत्याचार पीडितेचा विदारक अनुभव; पीडितेची मुख्यमंत्री,गृहमंत्री आणि मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार

डिजिटल पुणे    16-09-2024 14:32:04

पुणे : पतीने केलेल्या लैंगिक अत्याचाराविरुद्ध पोलिसात तक्रार देणाऱ्या पीडित महिलेची अवहेलना झाल्याने  पोलिस आणि ससुन हॉस्पिटल कडून आलेला  विदारक अनुभव तिने तक्रारीद्वारे मुख्यमंत्री,गृहमंत्री आणि राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे.१३ सप्टेंबर २०२४ रोजी ही तक्रार पिडीतेने केली आहे. 

या पीडित महिलेवर २४ सप्टेंबर २००४ ते ८ जानेवारी २०२४  दरम्यान  पतीकडून  लैंगिक अत्याचार होत होते आणि छळ केला जात होता.त्याविरुद्ध तिने कोंढवा पोलीस ठाण्यात मागील सहा महिन्यापासून ती तिच्या पतीविरोधात तक्रार करण्या साठी पोलीस स्टेशनाचे उंबरठे झिजवत होती. संपूर्ण तक्रार नोंदवून घेतल्यानंतर देखील पोलिसांनी केवळ 498अ आणि 34 या कलमाद्वारे गुन्हा दखल केला.पतिद्वारे झालेल्या लैंगिक अत्याचारा मुळे तिचे मोठ्या खासगी इस्पितळात तीन मोठे आणि नाजूक ऑपरेशन झालेले असून तिची गर्भाशयाची पिशवी काढून टाकल्याचे पुरावे आणि इतर उपचारांचे तपशील होते.इस्पितळातुन 3 महागड्या आणि नाजूक शस्त्रक्रिया तिच्यावर झाल्याचे पुरावे ती पोलिसांना देऊन कलम 377 लावण्याची मागणी कलम वाढ करण्याच्या अर्जाद्वारे करत होती, याचा तपास सुरु होता.परंतु तपासादरम्यान, कोंढवा पोलिस स्टेशनचे पुरुष तपास अधिकारी यांनी धक्कादायकपणे त्या प्रसंगाचा व्हिडिओ पुरावा मागितला, वर आणखी पुरावे सादर करण्याची लेखी नोटीस दिली. त्यावर तिने सदर नोटीस पोलीस आयुक्त  अमितेश कुमार यांना पाठवली, पोलिस आयुक्त अमितेश कुमार  यांनी महिलेच्या तक्रारी नंतर हस्तक्षेप केल्यानंतर, एका महिला तपास अधिकारी  या प्रकरणात नियुक्त करण्यात आली.पण तिची फरफट इथेच थांबली नाही.

12 सप्टेंबर रोजी पोलिसांनी तिला ससून जनरल हॉस्पिटल मध्ये दाखल केले.ससून जनरल हॉस्पिटलमध्ये, तरुण पुरुष निवासी डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी करायच्या संमती पत्रावर सही मागितली ज्याला तिने पुरुषाकडून तपासणीस विरोध करत नकार दिला पण त्यामुळे पीडितेला मानसिक आघात झाला. जुलै महिन्यातच कर्नाटक उच्च न्यायालयाने लैंगिक अत्याचार झालेल्या स्त्रीवर महिला डॉक्टर द्वारेच उपचार व तपासणी झाली पाहिजे असा स्पष्ट निर्णय दिलेला असून देखील ससून हॉस्पिटलमध्ये अद्याप अत्याचारग्रस्त महिलांची तपासणी पुरुष डॉक्टरच का करतात.डॉक्टर तिला तीन दिवस ऍडमिट राहावे लागेल व आणखी डॉक्टर तपासणी करतील असे सांगू लागले, त्यावर तिने मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांना याची तक्रार केली .त्या नंतर दोन दिवस हॉस्पिटल मध्ये असलेल्या महिलेची 10 मिनटात एका महिला डॉक्टर कडून तपासणी करण्यात आली.तिने आता तातडीने सरकारी कारवाई आणि हस्तक्षेपाची मागणी केली आहे.पीडितेचे वकील ऍड समीर शेख यांनी या प्रकरणात आयुक्त अमितेश कुमार यांचे आभार मानून आणखी सखोल तपास करण्याची मागणी केली आहे, त्या महिलेकडे तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे तिचे खासगी मोठ्या हॉस्पिटल मध्ये ऑपरेशन झाल्याचे पुरावे उपलब्ध आहेत . तसेच सोनोग्राफी मध्ये शरीरातील पिशवी काढून टाकल्याचे स्पष्ट दिसले असतानाही ससून चे डॉक्टर असे का वागले ,हे बुद्धीच्या पलीकडचे वाटत असल्याचे सांगत त्यांनी संशय व्यक्त केला. 

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती