सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • आपल्या आतिशी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री
  • चंद्रकांत दादा यांच्या ताफ्यातील गाडीला मद्यधुंद कार चालकाने दिली धडक.,चंद्रकांत दादा सुखरूप
  • आज सकाळी दगडूशेठ गणपतीची अजित पवार यांचे हस्ते पूजा
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
 शहर

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात अध्यापकांसाठी ई - कंटेंट डेव्हलपमेंट या विषयावर व्याख्यान

डिजिटल पुणे    18-09-2024 10:22:22

पुणे:  पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात अध्यापकांसाठी ई - कंटेंट डेव्हलपमेंट या विषयावर डॉ. गणेश मधे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम द्वारे निरंतर अध्यायनाच्या प्रक्रियेत शिक्षकांना त्यांच्या विषयाचे लेक्चर, नोट्स, प्रेझेंटेशन, व्हिडिओ किंवा तत्सम ई-कंटेन्ट निर्मिती करून ऑनलाइन कोर्स, स्वयंअध्ययन,  डिजिटल शाळा, तंत्रस्नेही प्रशिक्षण, गृहपाठ, सराव आदी उपक्रमांचा समावेश विद्यार्थ्यांचे गुणांकन, मूल्यांकन  या विषयी डॉ. गणेश मधे यांनी यांनी मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी प्राध्यापकांना हँडसऑन ट्रेनिंग दिले.

महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी शिक्षक, विद्यार्थी आणि पालक अशा सगळ्यांनाच आता आपल्या मानसिकतेत बदल करावा लागणार आहे. शिक्षकांना नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे लागेल. नवीन शैक्षणिक धोरणात ऑनलाइन शिक्षणाला महत्व दिले असून ई-कंटेंटची निर्मिती करून मॅनेजमेंट सिस्टम (एल एम एस) मॉड्यूलच्या माध्यमातून शैक्षणिक ई-कंटेंट विद्यार्थ्यांपर्यंत  पोहवणे सोपे झाले आहे. असे सांगितले. या प्रसंगी या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे तसेच सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. प्रशांत मुळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. शुभांगी शिंदे यांनी केले तर आभार डॉ. शुभांगी औटी यांनी मानले.

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती