सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • आपल्या आतिशी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री
  • चंद्रकांत दादा यांच्या ताफ्यातील गाडीला मद्यधुंद कार चालकाने दिली धडक.,चंद्रकांत दादा सुखरूप
  • आज सकाळी दगडूशेठ गणपतीची अजित पवार यांचे हस्ते पूजा
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
 शहर

Growing Up with Autism अर्थात ॲाटिझमसह मोठे होताना…..

डिजिटल पुणे    19-09-2024 18:17:57

 पुणे : गेल्या काही वर्षांमधे ॲाटिझम ( स्वमग्नता) असलेल्या मुलांचे प्रमाण वाढताना दिसते आहे. त्यांचे वेगळेपण( न्यूरोडायव्हर्सिटी) व त्यातून निर्माण होणारी बलस्थाने आणि कमतरता समोर येत आहेत. या मुलांचे पालक, शिक्षक व सगळे संबंधित लोक नवनव्या परिस्थितीला सामोरे जात असतात.पौंगडावस्थेत म्हणजे वयात येताना होणाऱ्या बदलांमुळे सर्वसामान्य मुलेही गोंधळलेली असतात. या बदलांना सामोरे कसे जायचे हे त्यांना व काहीवेळा त्यांच्या पालकांनाही कळत नसते. या गोंधळाला ॲाटिस्टिक मुले व त्यांचे पालकही अपवाद नाहीत.
 ॲाटिझमसह मोठे होत असलेल्या मुलांच्या वाढीविषयी त्यांच्या पालकांना अनेक शंका, प्रश्न असतात. वयात येताना या मुलांची वाढ कशी होणार- सर्वसामान्य मुलांसारखी होणार की तिथेही काही वेगळेपण असणार? या काळात त्यांना कसे सांभाळायचे? काही अडचण आली तर कोणाची मदत घ्यायची? अशा  अगणित चिंता त्यांना भेडसावत असतात.या सगळ्या मुद्यांचा विचार करणारा एक कार्यक्रम “वैखरी स्पीच थेरपी क्लिनीकने” आयोजित केला आहे. “Growing Up with Autism” हे चर्चासत्र पौंगडावस्थेत येत असलेल्या पालकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे शोधायला मदत करेल. इथे विविध क्षेत्रातील तज्ज्ञ पालकांना मार्गदर्शन करणार आहेत.
डाॅ. वैशाली देशमुख या बालरोगतज्ञ असून “ ॲडोलसंट मेडिसीन” या विषयातील तज्ज्ञ आहेत. त्या पौंगंडावस्थेतील हार्मोन्समधे होणारे बदल व त्यामुळे होणारे शारीरिक, लैंगिक बदल  या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.  अंजली जोशी या ज्येष्ठ ॲाक्युपेशनल थेरपिस्ट  आहेत. त्या ॲाटिस्टिक मुलांमधील “ विविध संवेदन प्रक्रिया व त्यांचे समतोलन कसे होते व त्याचा मुलांवर काय परिणाम होतो “ ( सेन्सरी प्रोसेसिंग व इंटिग्रेशन) या विषयावर चर्चा करतील.  पल्लवी इनामदार या अनुभवी बाल मानसशास्त्रतज्ज्ञ आहेत. त्या “ ॲाटिस्टिक मुलांचे वर्तन व वर्तनविषयक समस्या” या विषयावरील प्रश्नांना उत्तरे देतील.  वेदाली इनामदार या कार्यक्रमाच्या आयोजक असून स्पीच थेरपीस्ट आहेत. त्या या मुलांना “ संभाषण करणे व दुसर्याशी संवाद साधणे यामधे येत असलेल्या अडचणी” या विषयावर बोलतील.
ॲाटिझमसह पौंगंडावस्थेत येत असलेल्या मुलामुलींच्या पालकांना सर्वांगीण मार्गदर्शन या कार्यक्रमात मिळेल. हे चर्चासत्र रविवारी 22 सप्टेंबर 2024 या दिवशी सकाळी 10 ते 1 या वेळेत होणार आहे. कोथरूडमधील बाल शिक्षण शाळेच्या आवारातील म.ए.सो. सभागृहात चर्चासत्र होईल. कार्यक्रमाचे शुल्क रू. २००/- असेल. कार्यक्रमाचे मार्केटिंग पार्टनर परांजपे स्कीम्स व स्वनिकेतन प्रकल्प आहेत.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती