सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
 शहर

आर्याबाग दिवाळी अंक,'रंग महसुली' पुस्तकाचे १९ ऑक्टोबर रोजी प्रकाशन

डिजिटल पुणे    16-10-2024 15:34:29

पुणे : दर्जेदार साहित्य निर्मितीसाठी ख्यातकीर्त असलेल्या 'आर्याबाग' या  दिवाळी अंकाचे प्रकाशन ज्येष्ठ माजी सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते शनिवार,१९ ऑक्टोबर २०२४ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या नवलमल फिरोदिया सभागृह (विधी महाविद्यालय रस्ता ) येथे होणार आहे. याच कार्यक्रमात शेखर गायकवाड लिखित 'रंग महसुली' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.कल्याण तावरे हे आर्याबाग दिवाळी अंकाचे मानद संपादक असून विश्वास कणेकर हे संपादक आहेत.या अंकाचे यंदाचे हे तिसरे वर्ष आहे.प्रकाशन समारंभानंतर ज्येष्ठ हास्य कलाकार प्रा.दीपक देशपांडे हे 'हास्यकल्लोळ' कार्यक्रम सादर करणार आहेत.
 
कल्याण तावरे,विश्वास कणेकर,डॉ.रेवती संत,रंजना बाजी,परेश जयश्री मनोहर,अस्मिता चितळे,डॉ. नंदिता दाते या संपादक मंडळाने या दिवाळी अंकासाठी मेहनत घेतली आहे. प्रसिद्ध चित्रकार अन्वर हुसेन यांचे मुखपृष्ठ आहे.कलासंपादन प्रभाकर भोसले यांचे आहे. डॉ.तारा भवाळकर,न्या.मृदुला भाटकर,विनय हर्डीकर,सुषमा देशपांडे,सुनील सुखथनकर ,कै.डॉ.शंतनू अभ्यंकर,श्रीकांत बोजेवार,मुकुंद टाकसाळे,सॅबी परेरा,शेखर गायकवाड,प्रसाद नामजोशी,डॉ.आशुतोष जावडेकर आदी मान्यवरांनी लेखन केले आहे.शि .द .फडणीस ,गजू तायडे,अलोक,मधुकर धर्मपुरीकर ,संजय मिस्त्री यांनी 'हसताक्षरे ' हा नर्मविनोदी विभाग सांभाळला आहे. 'आर्याबाग -एक वैश्विक कुटुंब' अशी या अंकाची टॅगलाईन आहे. 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती