सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • संजय खन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश होणार
  • भाजपाची पहिली यादी उद्या जाहीर होणार
 शहर

पुण्याचे जादुगार चंद्रशेखर चौधरी यांचा २० रोजी कोची मध्ये गौरव समारंभ; ३ जादूगारांना दरवर्षी मिळणार लाखाची पारितोषिके, २० ऑक्टोबर रोजी कोची मध्ये ३०० जादुगारांच्या जादूचा आविष्कार

डिजिटल पुणे    17-10-2024 14:40:27

पुणे: पुण्यातील ज्येष्ठ जादुगार चंद्रशेखर चौधरी यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त दि.२० ऑक्टोबर २०२४ रोजी नॅशनल मॅजिक कन्व्हेन्शन मध्ये कोची शहरात सत्कार करण्यात येत असून या कार्यक्रमात ३०० हून अधिक जादूगार त्यांचा विस्मयकारक कलाविष्कार दाखविणार आहेत.मल्याळी मॅजिशियन असोसिएशनतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात चंद्रशेखर चौधरी यांच्यावतीने जादुगार रजत नरसिंहन,जादुगार शंकर,जादुगार अली यांना प्रत्येकी १ लाख रुपयांचा 'सी.के.चौधरी पुरस्कार' देऊन गौरविण्यात येणार आहे.कोचीमधील नॅशनल मॅजिक कन्व्हेन्शन मध्ये हा कार्यक्रम होणार आहे.चंद्रशेखर चौधरी यांच्यावतीने दरवर्षी ३ जादूगारांना दरवर्षी १ लाखाची पारितोषिके दिली जाणार आहेत.पुण्यात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.
 
१९६१ साली पुण्यात जादूचा पहिला प्रयोग करणाऱ्या चंद्रशेखर चौधरी यांनी देशभरात, देशाबाहेर हजारो जादूचे प्रयोग केले. बल्ब निर्मिती करणारे यशस्वी उद्योजक असतानाही चौधरी यांनी जादूगार म्हणून यशस्वी कारकिर्द केली. इंटरनॅशनल मॅजिक स्टार, लाईफटाईम अचिव्हमेंट अॅवार्ड असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. मॅजिशियन्स असोसिएशन पुणे या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता. जादूगारांची पुण्यात अधिवेशने आयोजित करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता.त्यांच्या या क्षेत्रातील योगदानाचा सन्मान २० ऑक्टोबर रोजी केला जाणार आहे.
 
 
 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती