सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • संजय खन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश होणार
  • भाजपाची पहिली यादी उद्या जाहीर होणार
 शहर

दि.२१ ऑक्टोबर रोजी 'संविधान अभ्यास वर्ग'

डिजिटल पुणे    18-10-2024 14:36:23

पुणे : भारत जोडो अभियान आणि संविधान प्रचारक लोकचळवळ यांच्या वतीने सोमवार,दि.२१ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजता ,एस.एम.जोशी फाउंडेशनचा कॉन्फरन्स हॉल येथे संविधान अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभ्यास वर्गामध्ये राज्यशास्त्राचे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक प्रा.अविनाश कोल्हे हे  'स्थानिक स्वराज्य संस्था :उगम आणि विकास' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.'हा अभ्यास वर्ग सर्वांसाठी खुला असून प्रवेश विनामूल्य आहे. जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी व्हावे', असे आवाहन भारत जोडो अभियानाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक आणि संविधान प्रचारक संदीप बर्वे  यांनी केले आहे.हा चौदावा संविधान अभ्यास वर्ग आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती