सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • संजय खन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश होणार
  • भाजपाची पहिली यादी उद्या जाहीर होणार
 शहर

अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे न्हावरे येथे एक दिवसीय ग्राम सर्वेक्षण शिबीर

डिजिटल पुणे    18-10-2024 15:29:33

पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पुरंदर तालुक्यातील न्हावरे (ता. शिरूर) येथे एक दिवसीय ग्राम सर्वेक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबाराचे उदघाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रा. डॉ. विलास आढाव यांच्या हस्ते झाले. मार्गदर्शक म्हणून अरविंद तेलंग महाविद्यालयाच्या प्रा. संगीता साळवे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी सांगितले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ. सविता कुलकर्णी यांनी केले.

ग्राम सर्वेक्षणातून हा गावच्या विकासाचे ध्येय पूर्ण करता येते. गावात उपलब्ध असणारी नैसर्गिक साधनसामुग्रीच्या बरोबरच सामाजिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक संचिताचे सर्वेक्षण करून त्यातून विकासाचा नवीन आराखडा मांडता येतो. असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रा. डॉ. विलास आढाव यांनी व्यक्त केले.

शिक्षणातून घेतलेल्या ज्ञानाचे उपयोजन केल्यावर शिक्षणाचा उद्देश पूर्ण होतो. या शिबिरात माती, पाणी, प्राणी, वनस्पती यांचे नमुने घेऊन परीक्षण, आर्थिक, सामाजिक, उर्जा, बचत गट याविषयी माहिती घेण्यासाठी प्रश्नावलीच्या आधारे घरोघरी सर्वेक्षण, अंगणवाडीतील मुलांची आरोग्य तपासणी, १० वी विद्यार्थ्यांची कलचाचणी, गावातील ओढा, नाला याचा भौगोलिक अभ्यास, वस्तीची रचना नकाशा तयार करण्यासाठी सर्वेक्षण, गावाचा सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय स्थितीचा अभ्यास करून या सर्वेक्षनाचा अहवाल पुस्तकरुपात प्रकाशित करण्यात येणार असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी सांगितले. या शिबिरात ५० विद्यार्थी व डॉ सविता कुलकर्णी, डॉ जी डी आवटे, प्रा. अपूर्वा बनकर, डॉ वंदना सोनवले, प्रा. अविनाश राठोड, प्रा. नवनाथ गाढवे, प्रा. प्रतिक कामठे, प्रा. उमा बोराडे,  प्रा. अपर्णा बनसे, प्रा. मनिषा जरक,  प्रा. माहेश्वरी जाधव, प्रा. विवेकानंद टाकळीकर, प्रा. अर्चना श्रीचिप्पा, प्रा. सुनिता खेडेक,  प्रा. प्रतीक्षा जराड या प्राध्यापकांनी सहभाग घेतला.

या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप,डॉ. नाना झगडे, न्हावरे गावचे सरपंच सरपंच कमलताई कोकरे, मल्लिकार्जुन विद्यालयाचे प्राचार्य  आर एन सानप, जिल्हा परिषद सदस्य वसंतराव कोरेकर, सर्जेराव साठे, अमोल गावडे, रामचंद्र कोरेकर, शांताराम हांडे, शामकांत साठे,  नानासाहेब कोरेकर, संभाजी बिडगर, सुभाष कांडगे,रोहिडेश्वर निंबाळकर आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे पद्माकर भोसले यांनी सूत्रसंचालन केले तर बाळासाहेब जाधव आभार मानले.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती