सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • मनसे ची ४५ उमेदवाराची यादी जाहीर पुण्यातून ३ उमेदवार कोथरूड : किशोर शिंदे हडपसर. : साईनाथ बाबर खडकवासला : मयुरेश वांजळे
  • सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर
  • सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर
  • दीपक नागपुरे खडकवासल्यांमधून इच्छुक देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट
  • आदित्य ठाकरे 24 तारखेला अर्ज दाखल करणार
  • बारामतीत युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी लढाई होणार
  • हडपसर सोलापूर मार्गावर गाडीमध्ये 22 लाख रुपये सापडले
 शहर

'ग्रीन सभा' उपक्रमातून पर्यावरणपूरक बांधकामावर विचार मंथन ; इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल कडून आयोजन

डिजिटल पुणे    19-10-2024 15:24:43

पुणे : इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल,(आय जी बी सी,)पुणे चॅप्टर ने कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज च्या सहकार्याने आयोजित केलेल्या 'ग्रीन सभा' उपक्रमात शनिवार, १९ऑक्टोबर रोजी सकाळी पर्यावरणपूरक बांधकाम संकल्पनेवर विचार मंथन करण्यात आले.ताओ आर्किटेक्चर प्रा. लि. चे प्रमुख मनीष बँकर,आय जी बी सी, पुणे चॅप्टर अध्यक्ष डॉ. पूर्वा केसकर,ज्येष्ठ आर्किटेक्ट विकास अचलकर,आय जी बी सी, पुणे चॅप्टर उपाध्यक्ष हृषीकेश मांजरेकर, सागर मुनीश्वर, नम्रता धामणकर आदी सहभागी झाले. डॉ. पूर्वा केसकर यांनी प्रास्ताविक केले.पी वाय सी जिमखाना येथे हा कार्यक्रम झाला.मनीष बँकर यांनी ' डिझाईन विथ नेचर ' विषयावर मार्गदर्शन केले. त्या नंतर ग्रीन सभा या विषयावर चर्चा झाली.
 
मनीष बँकर म्हणाले,' पुणे शहर पूर्वी आल्हादायक होते. मागील 3 दशकात तसे राहिले नाही. पूर्वीची वैशिष्ट्ये जपण्यासाठी बांधकाम क्षेत्रातील सर्वांनी योगदान दिले पाहिजे. सर्वच शहरांची स्थिती सुधारण्याची गरज आहे.पृथ्वीला इतर कोणताही प्राणी हानी पोचवत नाही.मनुष्य प्राण्याबाबत तसे म्हणता येत नाही.भारतीय बांधकाम शैलीतील चांगल्या गोष्टी घेतल्या पाहिजेत.इमारतीत राहणाऱ्या व्यक्तींप्रमाणे इमारतीलाही श्वास घेण्यास जागा ठेवली पाहिजे. सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. पर्यावरण पूरक बांधकाम साहित्य वापरले पाहिजे.एकात्मिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे.
 
डॉ. पूर्वा केसकर यांनी इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल(आय जी बी सी ) च्या ग्रीन रेटिंग सिस्टीम ची, प्रशिक्षण उपक्रमाची  माहिती दिली.त्या म्हणाल्या,'ग्रीन बिल्डिंग ही केवळ संकल्पना नसून बांधकामाचा आत्मा आहे. ते व्हिजन होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.सरकारने अजून प्रोत्साहन दिले पाहिजे. पाण्याचा, ऊर्जेचा कमी वापर,आरोग्यदायी कामाचे वातावरण,वेस्ट मॅनेजमेंट व्यवस्था अशा निकषाची माहिती त्यांनी दिली.कार्बन उत्सर्जन २०३० पर्यंत पन्नास टक्क्याने कमी करायचे उद्दिष्ठ राष्ट्रीय पातळीवर आहे.त्या दृष्टीने शाश्वत विकासाची वाटचाल केली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
 
हृषीकेश मांजरेकर यांनी अर्किटेक्क्ट आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यातील संकल्पनांच्या देवाणघेवाणीवर भाष्य केले.हे दोन्ही घटक एकत्रितपणे पर्यावरणपूरक संकल्पना पुढे नेतील.त्यासाठी आवश्यक संवाद व्हावा आणि वेळ परस्परांना द्यावा ,असे त्यांनी सांगितले. यावेळी हिंदुस्तान पेट्रोलियम एम.डी.आय. या संस्थेला 'ग्रीन बिल्डिंग 'प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सुजल शाह यांनी सूत्र संचालन केले.महेश बांगड,संजय तासगावकर, गणेश जाधव,अंशुल गुजराती यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी  उपस्थित होते

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती