सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • मनसे ची ४५ उमेदवाराची यादी जाहीर पुण्यातून ३ उमेदवार कोथरूड : किशोर शिंदे हडपसर. : साईनाथ बाबर खडकवासला : मयुरेश वांजळे
  • सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर
  • सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर
  • दीपक नागपुरे खडकवासल्यांमधून इच्छुक देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट
  • आदित्य ठाकरे 24 तारखेला अर्ज दाखल करणार
  • बारामतीत युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी लढाई होणार
  • हडपसर सोलापूर मार्गावर गाडीमध्ये 22 लाख रुपये सापडले
 शहर

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयात 'एक खिडकी' कक्षाची स्थापना

डिजिटल पुणे    22-10-2024 11:23:40

पुणे : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामकाजासाठी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा (अ.जा.) मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयात एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी कळविली आहे.

या कक्षामार्फत निवडणूक प्रचारासंबंधी वाहन परवाने, प्रचार सभा, कोपरा सभा परवानगी, तात्पुरत्या पक्ष कार्यालयासाठीची परवानगी, रॅली, मिरवणूक, रोड- शो, पदयात्रा यासंबंधीच्या परवानग्या, स्टेज, बॅरीकेटस्, व्यासपीठासाठीच्या परवानग्या त्यासंबंधीत करावयाच्या अर्जांचे विहित नमुने व आवश्यक कागदपत्रे याबाबतची माहिती उमेदवारांना पुरविण्यात येणार आहेत.

एक खिडकी कक्षातील सुविधांचा लाभ घेण्यासाठी पुणे कॅन्टोमेंट विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक कार्यालय भारतरत्न सर विश्वेश्वरय्या हॉल, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र ५, ३ रा मजला, अर्सेनल प्लॉट, हॉटेल सागर प्लाझासमोर, कॅम्प, पुणे याठिकाणी संपर्क साधावा, असेही श्री. भंडारे यांनी कळविले आहे.

 

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती