सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • मनसे ची ४५ उमेदवाराची यादी जाहीर पुण्यातून ३ उमेदवार कोथरूड : किशोर शिंदे हडपसर. : साईनाथ बाबर खडकवासला : मयुरेश वांजळे
  • सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर
  • सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर
  • दीपक नागपुरे खडकवासल्यांमधून इच्छुक देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट
  • आदित्य ठाकरे 24 तारखेला अर्ज दाखल करणार
  • बारामतीत युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी लढाई होणार
  • हडपसर सोलापूर मार्गावर गाडीमध्ये 22 लाख रुपये सापडले
 शहर

पिंपरी-चिंचवडमध्ये आगामी काळात कामगार न्यायालय निर्माण व्हावे यासाठी सर्वोतोपरी पाठपुरावा करणार - आमदार महेश लांडगे

डिजिटल पुणे    22-10-2024 14:37:25

पिंपरी चिंचवड : उद्योगनगरी, कामगारनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात लाखोंच्या संख्येने कामगार वास्तव्यास आहेत. परंतु, कामगारांना आपल्या लहान-मोठ्या अडचणींसाठी पुणे येथील कामगार उपायुक्त कार्यालयात जावे लागते. कामगारांना होणारा त्रास कमी करण्यासाठी शहरात कामगार आयु कार्यालय सुरु करावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे.पिंपरी-चिंचवड ही कामगार नगरी आहे. शहरातील लघु व मध्यम उद्योगांमध्ये तसेच विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना, युनियमच्या प्रतिनिधींना कामगार – व्यवस्थापन वादाबाबत पुणे-मुंबईत जावे लागते. मोशी येथे पिंपरी-चिंचवड न्यायालय संकुल उभारणीची पायाभरणी झाली आहे. आगामी काळात शहरात कामगार न्यायालय निर्माण व्हावे. यासाठी सर्वोतोपरी पाठपुरावा करणार आहे, असा संकल्प आमदार महेश लांडगे यांनी केला.

कामगार-मालक यांच्यातील वातावरण सामंजस्य व सौहार्दाचे राहावे, या दृष्टीने आमदार महेश लांडगे यांनी प्रयत्न केले आहेत. कंपनीमध्ये काही प्रसंगी तणाव निर्माण झाल्यास वाटाघाटीने प्रश्न सोडविले. कामगारांसाठी कायम मातृत्वाच्या भूमिकेतून त्यांनी कंपनी व्यवस्थापन आणि कामगारांमध्ये संवाद ठेवला. कंपनी व्यवस्थापन आणि कामगारांमधील संबंध बिघडू दिले नाहीत. कामगारांना किमान वेतन आणि मूलभूत सुविधांसह इतर अनेक लाभ मिळवून देण्यासाठी आमदार नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांच्या या पुढाकारातून अनेक कामगार आज स्थिरस्थावर झाले आहेत. भारतीय जनता पक्षाने त्यांना यंदा ‘ हॅट्रिक’ करण्याची संधी दिली. आता त्या संधीचे सोने कामगार करणार आहेत, असा विश्वास कामगारांनी व्यक्त केला.

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी कामगारांच्या वतीने कृतज्ञता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. स्वाभिमानी कामगार संघटना, महिंद्रा अँड महिंद्रा वेहिकल्स, लॉजिस्टिक, हेवी इंजिनचे सभासद या संमेलनामध्ये सहभागी झाले होते.संमेलनामध्ये आमदार महेश लांडगे, माजी महापौर राहुल जाधव, स्वाभिमानी कामगार संघटनेचे नेते रोहिदास गाडे, अध्यक्ष जीवन यळवंडे, टाटा मोटर्स कार प्लांटचे योगेश तळेकर तसेच महिंद्रा कंपनीचे कर्मचारी प्रदीप तळेकर, राहुल तळेकर, पंकज लांडगे, अजय घाडगे, शुभम बवले, सचिन वहिले, सुरज लांडगे, आकाश गव्हाणे, गणेश भुजबळ, सचिन धापटे, सुयोग भालेकर, संतोष भुजबळ, विक्रम पाटील, प्रवीण नाळे, राजू मदगे, प्रशांत म्हस्के आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन धापटे यांनी केले.

ईएसआय रुग्णालयासाठी कामगारांचे साकडे…

या संमेलनामध्ये कामगारांनी ईएसआय रुग्णालय मोहननगर, चिंचवड परिसरात असल्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघ परिसरातील कामगारांना रुग्णसेवा घेण्यासाठी मोठा पल्ला गाठावा लागतो. अत्यावश्यक गरज पडल्यास या रुग्णालयात पोहोचेपर्यंत कामगाराची दमछाक होऊन जाते. त्यामुळे भोसरी परिसरातच ईएसआय रुग्णालय असावे . कामगार न्यायालय सुद्धा पुणे परिसरात असल्यामुळे कामगारांना ये-जा करताना वेळ आणि पैसा हे दोन्ही खर्च करावे लागतात.त्यामुळे पिंपरी चिंचवड परिसरामध्ये न्यायालय संकुल उभारण्यासाठी आपण ज्याप्रमाणे पुढाकार घेतला. तसेच कामगार न्यायालय भोसरीतील न्यायालय संकुलात असावे अशी मागणी कामगारांनी या संमेलनात केली.

 

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती