सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • मनसे ची ४५ उमेदवाराची यादी जाहीर पुण्यातून ३ उमेदवार कोथरूड : किशोर शिंदे हडपसर. : साईनाथ बाबर खडकवासला : मयुरेश वांजळे
  • सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर
  • सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर
  • दीपक नागपुरे खडकवासल्यांमधून इच्छुक देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट
  • आदित्य ठाकरे 24 तारखेला अर्ज दाखल करणार
  • बारामतीत युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी लढाई होणार
  • हडपसर सोलापूर मार्गावर गाडीमध्ये 22 लाख रुपये सापडले
 शहर

भारतीय विद्या भवनमध्ये 'अनन्य आशा' दिवाळी पहाट कार्यक्रम; भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन

डिजिटल पुणे    22-10-2024 16:29:16

पुणे: भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ' अनन्य आशा' या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ' सुरसखी,पुणे' संस्थेच्या वतीने हा कार्यक्रम प्रस्तुत करण्यात येणार आहे.  ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी गायलेल्या मराठी व हिंदी गीतांचा नजराणा या कार्यक्रमातून पेश केला जाणार आहे.शनीवार,दि. २६ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी साडेसहा वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम होणार आहे. ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. हा कार्यक्रम विनामूल्य आहे. 
 
कार्यक्रमाची निर्मिती  मानिनी गुर्जर यांची आहे. संकल्पना व निवेदन रंजना काळे यांचे आहे. मानिनी गुर्जर, अनुराधा पटवर्धन, देवयानी सहस्रबुद्धे या गायिका गीते पेश करणार आहेत.साथसंगत संपदा खरे-देशपांडे (हार्मोनियम), भावना टिकले (तबला), शिल्पा आपटे (ढोलकी), उमा जटार (व्हायोलिन) किमया काणे (कीबोर्ड), उर्मिला भालेराव (साईड रिदम) यांची आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत  होणारा हा २२७ वा कार्यक्रम आहे.
 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती