पुणे : चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक निरीक्षक पदी मनवेश सिंग सिद्धू यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली.
निवडणूक निरीक्षक श्री. सिद्धू यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस, ए-३०६, पुणे असा आहे. संपर्कासाठी त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९१८८९१०५५६ असून दूरध्वनी क्रमांक ०२०-२९५१४८८६ असा आहे. निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी श्री. मुकुंद पवार यांचा संपर्क क्रमांक ८००७२००५८५ असा आहे.
निवडणूक निरीक्षक श्री. सिद्धू यांना व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे भेटण्याची वेळ सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत आहे, असेही चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून कळविण्यात आले आहे.
श्री. सिद्धू यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट देऊन येथील कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील नामनिर्देशन स्विकारण्याच्या ठिकाणाची पाहणी केली आणि निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या.