सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
 शहर

भारतीय विद्या भवनमध्ये २९ नोव्हेंबर रोजी नृत्य आणि संगीत सादरीकरण ; भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन

डिजिटल पुणे    26-11-2024 17:26:41

पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत नृत्य आणि संगीत सादरीकरण  पुण्यात आयोजित करण्यात आले आहे.हा कार्यक्रम 'इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स' चे पुणे उपविभागीय कार्यालय प्रस्तुत करणार आहे.शुक्रवार,दि.२९ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवन (सेनापती बापट रस्ता) सभागृहात होणार आहे.
 
डॉ.रेखा राजू(मोहिनीअट्टम), जयदीप मुखर्जी(सरोदवादन), सिध्दीविनायक पैठणकर(तबलावादन) हे कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.हा कार्यक्रम विनामूल्य असून भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत होणारा २३१ वा कार्यक्रम असल्याची माहिती भारतीय विद्या भवनचे सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती