सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
 शहर

महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त दि.२८ नोव्हेंबर रोजी अभिवादन मिरवणूक ; महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचा उपक्रम

डिजिटल पुणे    26-11-2024 17:27:58

पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी आणि आझम कॅम्पसमधील संलग्न संस्थांच्या  वतीने महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त अभिवादन मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक गुरुवार, दि.२८ नोव्हेंबर २०२४  रोजी सकाळी साडेआठ वाजता आझम कॅम्पस(पुणे कॅम्प) येथून निघणार आहे.

 मिरवणुकीचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष तसेच डॉ. पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. पी.ए.इनामदार यांच्या हस्ते होणार आहे. संस्थेचे सचिव प्रा.इरफान शेख यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.संस्थेच्या ३० आस्थापनांमधील ८ हजार विद्यार्थी,शिक्षक,कर्मचारी   अभिवादन मिरवणुकीमध्ये सहभागी होतील.महात्मा फुलेंच्या वेशातील विद्यार्थी बग्गीत बसणार आहेत.दरबार ब्रास बँड,बग्गी, बैलगाडी,महात्मा फुलेंचे सामाजिक संदेशाचे फलक घेऊन विद्यार्थी,पदाधिकारी,शिक्षक,प्राध्यापक सहभागी होणार आहेत.

 मिरवणुकीचा मार्ग आझम कॅम्पस, पूना कॉलेज, गोल्डन ज्युबिली बिल्डींग, काशीवाडी, टिंबर मार्केट, सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन, बब्बनमियाँ चौक, रिझवानी मशिद, मीठगंज पोलीस चौकी, मोमीनपुरा, चाँदतारा चौक, महात्मा फुले वाडा ( समताभूमी)असा आहे. 

 अभिवादन मिरवणूक उपक्रमाचे हे २० वे वर्ष आहे. दरवर्षी महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी( आझम कॅम्पस)च्या वतीने   छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात.

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती