पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालयात हडपसर विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार चेतन तुपे पाटील यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हडपसर विधानसभेच्या मतदारांनी मला दुसऱ्यांदा जनतेची सेवा करण्याची संधी दिली. हडपसरचा सर्वांगीण विकासासाठी मी प्रयत्न करत राहील. हडपसर शिक्षण संस्थेच्या अडचणी सोडवून विद्यार्थ्यांना उच्चत्तम सुविधा देण्यावर भर दिला जाईल. असे प्रतिपादन आमदार चेतन तुपे पाटील यांनी केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी आमदार चेतन तुपे पाटील यांचे महाविद्यालयास नेहमी सहकार्य लाभत असते. महाविद्यालयाच्या विकासासाठी त्यांचे मार्गदर्शनही लाभत असते. असे मत व्यक्त केले.
या प्रसंगी हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शंतनू जगदाळे, रोहिणी तुपे, वंदना काळभोर, उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप, प्रा. विलास शिंदे, डॉ. नाना झगडे आदी तसेच शिक्षक, शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनिल जगताप यांनी केले तर उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे यांनी आभार मानले.