पुणे : उपविभागीय अधिकारी राष्ट्रीय महामार्ग या ऑफिस मध्ये सरकारी कर्मचारी कामकाजाच्या वेळेत उपस्थित नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय आणि हेळसांड करण्याचा किविळवाणा प्रकार होतोय. सरकारी कर्मचाऱ्यांवरती वचक आहे की नाही असा प्रश्न उद्भवतो भला मोठा पगार सातवा वेतन लागू करूनही कर्मचारी कामचुकार पणा करताना मुख्य अधिकारी श्रुती नाईक एक्सएकटीव्ह इंजिनीर नॅशनल हायवे या सुद्धा वेळेत उपस्थित नसल्यामुळे अधिकाऱ्यांची तक्रार कोणाकडे करावी. मुख्याधिकारी कर्मचाऱ्यांनाच पाठीशी घालतात की काय असा प्रश्न उपस्थित होतो.
१० ते ५ कामकाजाची वेळ असते परंतु कर्मचारी नेहमी अकरा वाजल्यानंतर आलेले आढळतात कामानिमित्ताने आम आदमी पार्टी शहराध्यक्ष प्रशांत कांबळे सामाजिक न्याय विभाग हे १०. १५ मिनिटाताने वाजल्यापासून थांबून होते संबंधित कर्मचारी ११. ४५ मिनिटाने आले अशी व्यवस्था जर सरकारी असेल तर नागरिकांच्या समस्या सोडवणार कोण या संदर्भात तक्रार द. भि. विभूते अधीक्षक अभियंता यांच्याकडे केली असून कामचुकार कर्मचाऱ्यांवर ती कारवाई करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले.