पुणे : शासनाच्या 'देश का प्रकृती परीक्षण' या उपक्रमांतर्गत अण्णासाहेब मगर महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांचे आयुर्वेद कॉलेज आकुर्डी येथील डॉक्टरांच्या मदतीने प्रकृती परीक्षण करण्यात आले. सदर उपक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी केले. उद्घाटन प्रसंगी ते म्हणाले की, सदर उपक्रम समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असून त्यामध्ये सहभागी डॉक्टर्स विद्यार्थी व सेवकांची प्रकृती तपासून करतात व त्यामधील गुणदोषावर आयुर्वेदिक औषधांची माहिती देतात.
सदर उपक्रमात आयुर्वेद महाविद्यालयातील डॉ. सुभदा कुलकर्णी, डॉ. पाटील व त्यांचे सहकारी डॉक्टरांनी महाविद्यालयातील ९८३ विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचे प्रकृती परीक्षण केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ शुभांगी औटी, डॉ प्रशांत मुळे, डॉ. विलास शिंदे, डॉ अनिल जगताप, सर्व विभाग प्रमुख, महाविद्यालयातील आरोग्य विभागाचे सदस्य, सर्व मेंटॉर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपक्रम यशस्वी केला. डॉ शरद गिरमकर यांनी उपक्रमाचे समन्वयक म्हणून काम पाहिले.