सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 शहर

संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त स्वच्छता रॅली आणि स्वच्छता उपक्रमाचे आयोजन

डिजिटल पुणे    20-12-2024 17:28:27

पुणे : समाजाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देऊन कीर्तनातून प्रबोधन करणाऱ्या संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने मु. पो. उरळगाव ता. शिरूर जि. पुणे या ठिकाणी स्वच्छता रॅली व स्वच्छता उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांची स्वच्छता रॅली काढून प्रबोधन करण्यात आले. या रॅली चे उद्घाटन मा.  श्री. भानुदास सात्रस, श्री. तुकाराम जयवंत गिरमकर, श्री. गायकवाड, श्री. गजानन गिरमकर यांच्या शुभहस्ते व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ सविता कुलकर्णी, डॉ . गणेश आवटे, प्रा. विवेकानंद टाकळीकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. सविता कुलकर्णी यांनी स्वच्छतेचे महत्व सांगितले. 

वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे संत गाडगे महाराजांनी आपल्या किर्तनातून  स्वच्छता व चारित्र्य यांचे महत्त्व सांगितले. त्यांचा वसा विद्यार्थ्यांनी चालवावा या दृष्टीने हा उपक्रम केल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर विद्यार्थ्यांनी घोषणांमधून स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. त्यामध्ये आपला परिसर प्लास्टिक मुक्त करणे गरजेचे आहे हे पटवून दिले. "सुंदर भारत प्लास्टिक मुक्त भारत", "गाडगे महाराजांचा मंत्र स्वच्छतेचा मंत्र" "स्वच्छता राखू आरोग्य राखू", "प्लास्टिकचा वापर आरोग्याला घातक" अशा अनेक घोषणांनी स्वच्छतेचे महत्व विद्यार्थ्यांनी पटवून दिले. त्यानंतर गावातील परिसरात विद्यार्थ्यांनी स्वच्छता केली. यामध्ये प्लास्टिक वेगळे करून ओला कचरा झाडांमध्ये टाकण्यात आला.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गणेश आवटे सर यांनी तरआभार प्राध्यापक विवेकानंद टाकळीकर यांनी मानले.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती