सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 शहर

पुणेकरांचे नवीन वर्ष होणार जल्लोषात साजरे; हॉटेल, रेस्टॉरंट पहाटे 5 पर्यंत सुरू

डिजिटल पुणे    31-12-2024 14:36:07

पुणे : 2025 च्या स्वागतासाठी सगळेजण तयारीत आहे. 31 डिसेंबरच्या रात्री नक्की काय करायचे? याचे प्लॅनिंग देखील झालेले असेल. परंतु आता पुण्यातील थर्टी फर्स्ट साजरा करणाऱ्या लोकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आता पहाटे 5 वाजेपर्यंत रेस्टॉरंट, बार, हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. तसेच दारूच्या दुकानांना देखील मध्यरात्री 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी मिळालेली आहे. त्यामुळे पुणेकरांचा या वर्षीचा 31 डिसेंबर मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. कारण रात्री उशिरापर्यंत त्यांना पार्टी देखील करता येणार आहे. पुण्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी परवानगी दिलेली आहे.

पुण्यामध्ये अनेक लोकप्रिय ठिकाणे आहेत, त्या ठिकाणी अनेक लोक एकत्र येऊन नवीन वर्षाचे स्वागत करत असतात. यामध्ये खास करून डेक्कन परिसरात खूप जास्त गर्दी असते. येथे 31 डिसेंबरच्या रात्री नेहमीच गर्दी पाहायला मिळते. फुगे, फटाके या सगळ्यांनी नवीन वर्षाचे स्वागत करतात. यासोबत कोरेगाव पार्क, जंगली महाराज रोड, कॅम्प, विमान नगर, हिंजवडी बावधन, फर्ग्युसन कॉलेज रोड, खराडी, विमान नगर, कोथरूड, औंध या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचे नियोजन असते. यासोबतच पवनानगर, पानशेत, भुगाव, मुळशी, लोणावळा या ठिकाणी हॉटेल्स आणि रिसॉर्ट मोठ्या प्रमाणात बुक असतात. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक लोक पर्यावरणामध्ये जात असतात. आता तुम्हाला यावर्षी या सगळ्या गोष्टींचा चांगल्या प्रकारे आनंद घेता येणार आहे.

मद्यपान करून वाहन चालवणाऱ्याला दंड 

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जरी पुण्यातील लोकांना मोठा सूट दिली असती, तरी तुम्ही मद्यपा करून गाडी चालवू नका. कारण पुणे शहरांमधील अनेक चौकांमध्ये पोलीस असणार आहेत. दारू पिऊन ड्रायव्हिंग केली तर त्याला दंड बसणार आहे. त्यामुळे नवीन वर्षाचा आनंद साजरा करताना प्रत्येकाने काळजी घ्या. याबाबतचे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेले आहे . नवीन वर्षामध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पुण्यातील तीन शहरांमध्ये जवळपास 500 पेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आलेला आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती