पुणे : दिनांक 31 डिसेंबर 2024 च्या रात्री तीस वर्षा पासून रात्रीचे रक्तदान हा उपक्रम कै. आनंदजी दिघे साहेबांनी सुरू केलेला आजतागायत यशस्वीपणे चालू आहे. यावेळी नवीन वर्षाच्या स्वागताला तरुणांनी दूध प्यावे व रक्तदान करून एक नवा आदर्श निर्माण करावा हेच रात्रीचे रक्तदान आयोजित करण्यामागे मूळ उद्देश होता आणि आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय ना. एकनाथरावजी शिंदे यांच्या रक्तानंद ग्रुप ठाणे तर्फे त्यांच्या हस्ते 1 जानेवारी 2025 च्या नवीन वर्षाच्या प्रहरीच राज्यस्तरीय रक्त कर्ण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दिनांक 31 डिसेंबर 2024 च्या रात्री आणि 1 जानेवारी 2025 च्या प्रहरी ससून रुग्णालयाचे समाजसेवा विभागाचे विभागप्रमुख डॉ. शंकर माधवराव मुगावे यांना नवीन वर्षाच्या प्रहरीच राज्यस्तरीय रक्तकर्ण पुरस्कार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी राज्यातील इतर तीन ठाणेकरांचा ही सन्मान करण्यात आला. राज्यस्तरीय रक्त कर्ण पुरस्कारासाठी रक्तदान चळवळींच्या क्षेत्रात अतुलनीय काम करणाऱ्या व वैयक्तिक नियमित रक्तदान करणाऱ्या रक्तदाते यांचा यावेळी राज्यस्तरीय रक्तकर्ण पुरस्कार प्रदान करून सन्मान चिन्ह आणि सन्मान पत्र देऊन शतकवीर रक्तदात्ता म्हणून यथोचित सन्मान करण्यात आला. ससून रुग्णालयाचे समाजसेवा विभागाचे* विभागप्रमुख डॉ. शंकर माधवराव मुगावे यांना रक्तदान चळवळींच्या क्षेत्रात अतुलनीय काम व रक्तपेढी चा समाजशास्त्रीय दृष्टी कोणातून संशोधन करून पीएच.डी. प्राप्त केल्याबद्दल व वैयक्तिक नियमित रक्तदान केल्यामुळे त्यांना स्थानिक , राज्यस्तरीय आणि रास्ट्रीय स्थरावरचे एकूण 35 ते 40 पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
डॉ. शंकर मुगावे यांचे रक्तदान चळवळींच्या क्षेत्रात अतुलनीय काम आहेच तसेच ते स्वत: नियमित रक्तदाते आहेत. त्यांचे आजता गायत 105 वेळा ऐच्छिक रक्तदान झाले आहे. आणि आजतागायत त्यांनी वीस हजार च्यावर रक्तदान शिबीर आयोजित करून चार लाख रक्तदात्यांचे रक्त संकलन केले आहे. ते रक्तदान क्षेत्रात गेल्या पंचवीस वर्षांपासून कार्यरत आहेत. तसेच डॉ. मुगावे यांनी कोरोना महामारीच्या काळात पश्चिम महाराष्ट्राचे पुणे विभागाचे मुख्य रक्तपेढी समन्वयक म्हणून तीन वर्षे काम केले आहे. यावेळी पुणे विभाग रक्तदान संकलनात पहिल्या क्रमांकावर होते. यांसाठी पुणे विभागीय आयुक्तांनी त्यांचा सन्मान केला होता.