सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 शहर

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात ज्ञान विज्ञान वाचन चळवळ व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प

डिजिटल पुणे    03-01-2025 18:08:40

पुणे  : समृद्ध समाजातील पुस्तकप्रेमी लोकांचा अनुभव, पाश्चात्त्य देशांमधल्या पुस्तक संस्कृतीच्या विविध पैलूंचं होणारं दर्शन 'लीळा पुस्तकांच्या' या पुस्तकात अनुभवायला मिळते. पुस्तकं वाचण्याचा अनुभव हा स्वतःला आरशात निरखण्यासारखा सुखद अनुभव असतो. पुस्तक वाचनाची आवड निर्माण होऊन 'पुस्तकप्रेमी', 'पुस्तकवेडे' लोक समाजात निर्माण झाल्यास आपला समाज समृद्ध होईल पुस्तक संस्कृतीच समाज समृद्ध करते" असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे संपादक प्रा. डॉ. पुरूषोत्तम काळे यांनी केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ज्ञान विज्ञान वाचन चळवळ व्याख्यानमाला तसेच वाचन संकल्प महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत लेखक वाचक संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प प्रा. डॉ. पुरूषोत्तम काळे यांनी गुंफले. त्यांनी  नितीन रिंढे लिखित 'लीळा पुस्तकांच्या' या पुस्तकाचे परिचयात्मक विवेचन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. नाना झगडे यांनी केले.

प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातून अथवा विकत घेऊन पुस्तक वाचले पाहिजे व इतरांनाही वाचण्यास प्रोत्साहित केले पाहिजे तरच वाचनसंस्कृती जोपासता येईल. वाचनासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करून त्यांच्यामध्ये वाचनाची आवड र्निमाण व्हावी हा या उपक्रमाचा हेतू असल्याचे सांगितले.या प्रसंगी डॉ. नीता कांबळे, डॉ. दत्तात्रय संकपाळ, प्रा. सूरज काळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अश्विनी घोगरे यांनी केले तर आभार डॉ. गणपत आवटी यांनी मानले.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती