सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 शहर

पथारी व्यावसायिकांसाठी मार्गदर्शन शिबीर

डिजिटल पुणे    08-01-2025 13:56:31

पुणे : भारतीय जनता पार्टी पुणे शहर हॉकर्स आघाडीचे अध्यक्ष सागर दहिभाते यांच्यावतीने पथारी व्यावसायिकांना आर्थिक साक्षरता,कौटुंबिक अर्थ नियोजन,भविष्यातील निर्वाह निधी नियोजन आणि बचत नियोजन या विषयांवर मार्गदर्शन  शिबीर आयोजित करण्यात आले. तुळशीबाग येथे झालेल्या या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. शिबिरात सी ए  विजयराव अलिमकर यांनी आर्थिक साक्षरता व कौटुंबिक अर्थ नियोजन यावर आपले बहुमोल मार्गदर्शन केले.  विमा तज्ञ  राहुल काळभोर यांनी भविष्यातील निर्वाह निधी नियोजन आपल्या अनुभवावरून विस्तृतपणे उदाहरणासहित मार्गदर्शन केले.सोमनाथ भोसले यांनी केंद्र शासन- राज्य शासन व पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातुन राबविल्या जाणाऱ्या वैद्यकीय योजनांची माहिती दिली.
 
छोटे व्यावसायिक देखील महत्वाचे असून  त्यांच्या भवितव्याची काळजी काही चिंतनातुन करणे गरजेचे  असल्याने या  उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पथारी व्यावसायिकांना आर्थिक गुंतवणुकीत साक्षर करणे,आरोग्याबाबत जागरूक करून  शासनाच्या योजनांचा वापर कसा करून घेता येईल,यासाठी प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या आणी चौथ्या सोमवारी श्री गजानन मंडळ चौक (तुळशीबाग) येथे शिबीर आयोजित करण्यात येणार आहे,असे सागर दहिभाते यांनी सांगितले.
 
  पुणे शहराचे खासदार केंद्रीय मंत्री मुरलीधर  मोहोळ,भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे,कसबा विधानसभा मतदारसंघाचे  आमदार  हेमंत रासने ,भाजपा शहर सरचिटणीस राघवेंद्र  मानकर यांच्या मार्गदर्शना खाली  पथारी व्यावसायिकांना आर्थिक साक्षरता,कौटुंबिक अर्थ नियोजन , भविष्यातील निर्वाह निधी नियोजन आणि बचत नियोजन याबाबत सक्षम केले जाईल,असेही त्यांनी सांगितले. 
 

 

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती