सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 शहर

शिक्षणासोबतच व्यावसायिक कौशल्य गरजेचे प्राचार्य डॉ.नितीन घोरपडे

डिजिटल पुणे    08-01-2025 18:05:26

पुणे :  पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर  ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल आणि महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ ,महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे  उद्घाटन महाविद्यालयात करण्यात आले .आजच्या स्पर्धात्मक युगात  शिक्षणासोबतच विविध व्यावसायिक    कौशल्य ही असणे अत्यंत गरजेचे आहे असे मत  प्राचार्य डॉ.नितीन घोरपडे व्यक्त केले या प्रशिक्षण अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध कोर्सचे मोफत प्रशिक्षण महाविद्यालयात दिले जाणार असून विद्यार्थ्यांना तीन महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्या वेतन मिळणार आहे मा.चंद्रकांत माने जिल्हा व्यवस्थापक समाज कल्याण ,पुणे , यांनी यावेळी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनामार्फत उपलब्ध असणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली .

याप्रसंगी मा.हरीश कुऱ्हाडे सहाय्यक जिल्हा व्यवस्थापक समाज कल्याण , पुणे , प्रशिक्षण व्यवस्थापक श्रीमती पूजा  नाईक, प्रशिक्षण समन्वयक श्री. तेजस नवगिरे  व श्री शुभम येंडें हे महाराष्ट्र शासनातर्फे कार्यक्रमास उपस्थित होते महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे डॉ.शुभांगी औटी  तसेच ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलचे सदस्य  डॉ. शितल जगताप  प्रा.उर्मिला धनगर, प्रा. विशाल झेंडे प्रा. मुकेश पाटील प्रा. तेजश्री कोकरे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.नीता कांबळे यांनी केले .प्रा.आशा माने यांनी कार्यक्रमाचे आभार मानले  तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रेखा निसाळ यांनी केले


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती